लोकांना हे राजांचे भाषण ऐकून फार वाईट वाटलें. राजा आपल्या प्रजेची घ्यावी तशी काळजी घेत नाही, असे जो तो म्हणू लागला.
नंतर ते सर्व लोक कालहस्ती नांवाचा राजाचा सेनापति होता, त्याच्यापाशी गेलें, आणि त्यांनी आपलें गा-हाणे त्याच्यासमोर मांडिलें. त्याने चोराचा ताबडतोब बंदोबस्त करण्यांत येईल, असे अभिवचन देऊन त्यांचे सांत्वन केले. कालहस्ती मोठा करारी माणूस होता. त्यामुळे त्याच्या वचनानें नागरिकांना धीर आला व ते आपापल्या घरी निघून गेले.
कालहस्तीने त्यांच दिवशी रात्री आपलें गुतहेर सर्व शहरांमध्ये पसरविले. त्यांनी रसकाला एका माणसाचा खून करून त्याचें मांस टोपलीत भरून जात असता पकडलें, व ताबडतोब आपल्या धन्यासमोर नेऊन उभें केलें.
कालहस्ती म्हणाला “अरे रसक! तूं राजाच्या मर्जीतला स्वयंपाकी असून हा प्रकार काय आरंभिला आहेस?”
रसक म्हणाला “सेनापतिमहाराज, मी माझ्या पोटाची खळी भरण्यासाठी किंवा कुटंबांचे पोषण करण्यासाठी हें कर्म करीत नाही. सरकारस्वारीच्या हुकुमामुळे मला हें कर्म करावें लागत आहे. माझ्या धन्याला एक दिवसदेखील नरमांसावाचून अन्न चालत नाही!”
सेनापति म्हणाला “रसक, उद्यां मी तुला घेऊन राजवाड्यांत जाईन. तेथें राजासमोर ही गोष्ट तूं सांगितली पाहिजेस.”
दुसर्या दिवशी सकाळी रसकाला घेऊन कालहस्ती राजवाड्यांत गेला आणि राजाला म्हणाला, “महाराज, या रसकाला पाठवून आपण नगरवासी स्त्रीपुरुषांना ठार मारावयाला लावता, ही गोष्ट खरी आहे काय?”
राजा म्हणाला “रसकानें जे काहीं सांगितलें आहे, ते सत्य आहे. माझ्यासाठी तो हे कर्म करीत असतो.”
राजा आपल्या स्वयंपाक्याला पाठवून लोकांचे खून करतो व त्यांचे मांस खांतो हे वर्तमान सकाळ होण्याच्या आधीच सर्व राजधानीभर पसरले. सेनापति रसकाल घेऊन राजवाड्यांत आला, त्याच वेळी बाहेरच्या बाजूस, आपल्या राज्याचा बंदोबस्त काय करावा, याचा विचार करण्यासाठी अनेक गोष्टी सांगून नरमांसापासून निवृत्त होण्यासाठी पुष्कळ उपदेश केला, परंतु राजाच्या अंत:करणांवर त्याचा काहीँएक परिणाम झाला नाही.
तो म्हणाला “सेनापति, तूं दुसरी कोणतीहि गोष्ट मागितलीस, तरी ती कबूल करण्यास मी तयार आहे: परंतु नरमांसापासून निवृत्त होणे प्राणान्तीहि माझ्याकडून व्हावयाचं नाही!”
सेनापतीने राजाचा निश्चय बाहेर जमलेल्या नागरिकांना कळविला. तेव्हा ते म्हणाले “सेनापतिमहाराज! नरमांसभक्षक चोराचें मन वळविण्याची खटपट तुम्ही का करिता? त्याला याच क्षणी या राज्यांतून बाहेर घालवून द्या, नाही तर त्याची येथें धडगत दिसत नाही!”
पुन: सेनापति राजाजवळ जाऊन म्हणाला “महाराज, आपल्या या अमानुष कृत्यानें सर्व नागरिक त्यांत क्षुब्ध झाले आहेत. आपल्याला नरमांस सोडून देणें शक्य नसेल, तर या राज्यांतून अत्यंत पण याच क्षणी निघून जावें हें बरें! आपण जर इत:पर येथें राहिला, तर सर्व नागरिक मलादेखील अनावर होऊन येथल्यायेथेच आपल्याला ठार करतील!”
ब्रह्मदत्त अतिशय घाबरला व सेनापतीला म्हणाला “मी आतांच्या आतां येथून निघून जातो; परंतु माझ्या रसकाला मात्र मजबरोबर द्या. मला माझी शस्त्रास्त्रें आणि माझा रसक मिळाला, म्हणजे मला या राजवाड्यांतील दुसरी कोणतीहि संपत्ति नको आहे!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.