प्रवेश तेरावा
(दिवाणखाना, लक्ष्मीधरपंत सर्चित बसले आहेत.)

लक्ष्मी -  त्या दिवशीं नारायणास लाथ मारून घालवलें; परंतु काय असेल तें असो, मन आंतल्या आंत खात आहे. मी जर खरा धार्मिक असतों, तर माझं मन शांतिहीनन कां बरं झालं असतं ? निरपराधी माणसाजवळच सुख व शांति नांदतात. आणि खरें पाहूं जातां, नारायण करतो तें सनातनी वैष्णवधर्मीत आहेच; पण रूढीचा पीळ उलगडत नाहीं. काय करावं ? काल रात्रीचं काय भयंकर स्वप्न ! ' माझ्या नारायणाच्या डोक्यांत कु-हाड घालणारा तो भयंकर काळपुरूष ! परंतु त्या दुस-या मालाधारी शुभ्रवर्ण पुरूषानं त्याचा हात पकडला ! ' काय या स्वप्नाचा अर्थ ? माझा नारायण तरी सुरक्षित आहे ना ? खोटया समजुतीचा भरीस पडून मीं त्यास घालविलं. तो जातांना वंदन करावयास आला तर त्याला लाथ हाणली ! अरेरे ! देवा, माझा नारायण पुन्हां येऊं दे रे ! मी त्याचं कोमल मन दुखवणार नाहीं. आतां कधीं ! त्याची आई स्वर्गातून मला दोष देत असेल.
(पडद्यांत ' अहो लक्ष्मीधरपंत, अहो लक्ष्मीधरपंत ' अश हांका ऐकूं येतात.)

लक्ष्मीधरपंत -  या हो या,कोण ? वासुदेवराव ?

वासुदेवराव -  (प्रवेश करून ) अहो लक्ष्मीधरपंत, तुम्हाला अजून कळलं नाहीं का हो ? वार्ता बरी नहीं तुमचा मुलगा नारायण परवां रात्रीं रस्त्यांत घेरी येऊन पउलेला आढळला. त्याला भयंकर तापही येत आहे.

लक्ष्मीधरपंत -  कोण ! माझा नारायण ? त्याला ताप आला ? काय, तो रस्त्यांत पडला ? अरेरे ! कुठं आहे तो ?

वासुदेवराव
-  असे घाबरूं नका. त्याची सर्व व्यवस्था झाली आहे. रस्त्यांतून एक बालवीर चालला होता. त्याला तो आढळला. त्यानं शिटी फुंकली व इतर बालवीर जमा झाले; आणि त्यांनीं त्यास उचलून स्वत:च्या संघमंदिरात नेलें. सध्यां तो तिथंच आहे. त्याचे शिक्षक व डॉक्टर यांनीं त्याची नीट शुश्रूषा चालवली आहे. तुम्हांस बालवीर -शिक्षक सांगावयास कसें आले नाहीत ? ते तर खास यावयाचे !

लक्ष्मीधरपंत
- मी त्यांना पूर्वी टाकून बोललों होतों; म्हणून ते रागावले असतील ?

वासुदेवराव -  छे: ! बालवीर-शिक्षक हे कधीं रागबीग मनांत धरीत नाहीत ! ते एवढया तेवढयावरून राग मनांत धरतील तर बालवीरांचे गुरूच शोभर नाहींत ! मनांत अढी धरून बसेल तो बालवीर कसला ?

लक्ष्मीधरपंत - वासुदेवराव ! मला धीर धरवत नाहीं. केव्हां एकदां डोळयानीं नारायणास पाहीन, असं झालं आहे. पूर्वीचा माझा त्याच्यवरील राग सर्व मावळला. वासुदेवराव, माझा नारायण हाच आमच्या घरचा आधार ! आमचा तारक ! माझा मार्गदर्शक आहे. चला, येतां माझ्याबरोबर ? आपणच त्याच्या शिक्षकाकडे जाऊ. माझे अहंकाराचे डोंगर वितळून सपाट झाले ? त्यांची ह्रदयांत कारूण्याची गंगा वाहूं लागली आहे. वासुदेवराव, चला !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel