प्रवेश पंधरावा
(पांडवा बसला आहे.)

पांडबा -  नानांना उतार पडला. देवानं दया केली. खरा गरिबांचा कनवाळू तूंच ! (राघू कपडे धुवून येतो. )

राघू -  बाबा बघा; कपडे छान निघाले ते. खादीचे कपडे असे लख्ख निघतात.

पांडबा -  राघू, साबण रे कुठचा पोरा ?

राघू -  ते विद्यार्थी आम्हांला देतात; म्हणतात, आम्ही तुम्हांला आठवडयास एक वडी देत जाऊं; पण तुम्ही सूत मात्र नियमित कातलं पाहिजे. बाबा, आतां आपण बामणाबाणी नाहीं दिसणार का हो ? मी कपडे वाळले कीं ते घालीन अन् नानांच्या घरीं जाऊन येईन.

पांडबा -  मी पण येणार आहें. पण मी लोकडांची मोळी आणून ती विकल्यावर येईन. आज तुलाच रांधलं पाहिजे. ती गेली आहे कामावर.

राघू -  मी भाकर करीन व ती झांकून ठेवून जाईन. (जातो.)

पांडबा -  चला, आपण बी कु-हाड घेऊन जावं .(जातो.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel