डॉक्टर -  अरे, जग म्हणजे असंच ! नारायणा, कुणी वरून हसतात तर कुणी मनांतच रडतात. कांहीं वरून गोड बोलतात, तर कांहीच्या पोटांत काळकूट भरलेले असतं. वागतात एका प्रकारें, पण मनांत विचर दुसरेंच ! आचार, विचार आणि उच्चार या तिहींमध्यें एकरूपता दाखवणारा सज्जन या जगांत खरोखर विरळा ! नारायणा, आमच्यासारखे उदरंभरू व समाजाच्या लहरीप्रमाणें वागणारें लाकच इथूनतिथून भरलेले !

नारायण -  जगाचं हें असलं स्वरूप पाहून माझ्या ह्रदयाचं पाणी पाणी होतं हो ! सरभूत वस्तु दूर लोटून सालपटं उराशीं धरणं, मोती भिरकावून शिंपले पेटींत ठेवणं, मनुष्याच्या ह्रदयाचा खून करून रूढीची पूजा करणं, यांतच लोक गढून गेलेले ! डॉक्टरसाहेब, ख-या देशदैन्याकडे कुणीच बघत नाहींत. हो, पण आतां ही चर्चा राहूं दे ! आपण माझ्या बरोबर येतां ना ? एका गरिबाच्या पोराचें प्राण वांचवतां ना ? (डॉक्टरांची नकारदर्शक मुद्रा पाहून) डॉक्टर, ही विद्या शिकलांत तरी कशाला ? खरं देशदैन्य गरिबांच्या झोंपडयांत असतं ! लोकमताच्या तलवारीच्या धारेखाली राहून तुम्हीहि आपल्या शिक्षणानं सुधारलेल्या बुध्दीचा उपयोग देशदैन्याकडे डोळेझांक करण्याकडे करणार काय ? देशाचं दैन्य चारी बाजूंनीं वावटली-सारख धांवत आहे.

पद ( चाल-शाम चुनरिया )
देश अपुला दीन झाला । झोप त्याम बहु बाजुंनि जडाला । जरि नाहीं सावध झाला तरी बुडाला ॥ ध्रू० ॥ ओघ धनाचा अखंड गेला । जनता काढि तरि उपोषणाला । वसन नसे धड कुणाकुणाला ॥ १ ॥ गोधन आनन अनुदिनीं बघतां । अंत्यजांस झणिं पुनित न करतां । हाय कथूं किती कथा तुम्हांला ॥ २ ॥

म्हणून म्हणतों आपल्या सदसद्विवेक बुध्दीला चालना द्या !

डॉक्टर - नारायणा, चल ! येतों तुझ्याबरोबर, लोक काय म्हणतील तें म्हणोत ! सत्याची पूजा करणें हाच खरा धर्म हें मलाहि शिकलं पाहिजें चल.

नारायण - डॉक्टर असं होईल तरच सारा समाज सुधारेल. चला. (जातात.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel