बर्‍याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
         
नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥

मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ [असूनही ] नम्रपणा [असणारा ] फारुच विरळा .

विनयस्तत्र सुदुर्लभ:एवढे वचन वापरले तरीही संपूर्ण आशय लक्षात येतो .नरजन्म ,विद्या, चारित्र्य, आणि त्याबरोबरच नम्रपणा या चार गोष्टी एकत्र असणे दुर्लभ आहे .--विद्या विनयेन शोभते असे संस्कृत वचन आठवले .मनुष्य जन्म असेल ,परंतु चारित्र्य नसेल; विद्या असेल  , परंतु गर्व मग्रुरी उर्मटपणा अहंकार असेल ;.तर मनुष्य जन्माचा व विद्येचा काय उपयोग ?नरजन्म विद्या चारित्र्य आणि नम्रपणा हे सर्व एकत्र असणे जरा दुर्मिळच .दूध साखर केशर आणि त्याला वेलचीचा सुगंध  या गोष्टी एकत्रित असलेल्याप्रमाणे मिश्रणाप्रमाणेअसा मनुष्य  मधुर असेल .

           स्मरणीय 
       विनयस्तत्र सुदु्र्लभ:

२५/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel