प्राचीन काळी, अगदी आघाडीला लांब भाले घेतलेल्या सैनिकांच्या रांगा असत. त्यांचा उपयोग संरक्षणासाठी होई. रथाच्या मागे व मध्ये पायदळ भालेकरी असत. ‘प्रास’ म्हणजे फेकता येण्यासारखे भाले घेतलेले पायदळ प्रासिक घोडेस्वारांच्या मागे असत. भालाईत घोडेस्वार बगलांवर ठेवत. धनुर्धाऱ्यांनी शत्रुवर बाणांचा वर्षाव सुरू केल्यावर शत्रुसैन्यात गोंधळ उडाला, की भालाईत घोडेस्वार व त्यांच्या पाठोपाठ पायदळ प्रसिक शत्रूवर प्रासांचा व शल्कांचा (डार्ट) मारा करीत करीत शत्रुला भीडत. जड भाल्यांनी तसेच तलवार, गदा व कुऱ्हाडींनी शत्रूची कत्तल करीत. शत्रू अंगाशी भीडल्यावर भाला वापरणे शक्य नसते. बंदुका आल्यानंतर बंदुकधाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भालेकरी लागत. बंदूकीला संगीन लावण्याची सोय झाल्यावर भालेकऱ्यांची गरज उरली नाही
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.