महर्षी अगस्त्य एक वैदिक ऋषी होते. निश्चितच विजेचा शोध थॉमस एडिसनने लावला परंतु एडीसनने आपल्या एका पुस्तकात लिहिले आहे की एका रात्री मी संस्कृत मधले एक वाक्य वाचता वाचता झोपी गेलो. त्या रात्री मला स्वप्नात त्या संस्कृत वाक्याचा अर्थ आणि रहस्य समजले आणि मला मदत मिळाली.

http://www.cimg.in/images/2014/01/10/53/132967516_13893422251_large.JPEG

महर्षी अगस्त्य दशरथ राजाचे राजगुरू होते. त्यांची गणना सप्तर्षींमध्ये केली जाते. ऋषी अगस्त्य यांनी 'अगस्त्य संहिता' नावाच्या ग्रंथाची रचना केली. आश्चर्यजनक रूपाने या ग्रंथात विद्युत उत्पादनाशी संबंधित सूत्र मिळतात -

संस्थाप्य मृण्मये पात्रे
ताम्रपत्रं सुसंस्कृतम्‌।
छादयेच्छिखिग्रीवेन
चार्दाभि: काष्ठापांसुभि:॥
दस्तालोष्टो निधात्वय: पारदाच्छादितस्तत:।
संयोगाज्जायते तेजो मित्रावरुणसंज्ञितम्‌॥

-अगस्त्य संहिता

अर्थात : एक मातीचे भांडे घ्या, त्यामध्ये तांब्याची पट्टी (Copper Sheet) ठेवा, आता शिखीग्रीव (copper sulphate) घाला, मग मध्ये ओली वाळू लावा, वर पारा आणि जस्त घाला, आता तारा जोडल्या तर त्यातून विजेची निर्मिती होईल.

अगस्त्य संहितेत विजेचा उपयोग इलेक्ट्रोप्लेटिंग साठी करण्याचे देखील विवरण मिळते. त्यांनी बैटरी द्वारे तांबे, सोने किंवा चांदीवर पॉलिश चढवण्याचा विधी देखील काढला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel