संपूर्ण विश्वाला खगोल विज्ञान प्रदान करण्याचे श्रेय भारतालाच मिळते. वेद हे मानव संस्कृतीचे अगदी सर्वांत जुने लिखित दस्तऐवज आहेत. प्रोफेसर विंटरनिट्ज ही गोष्ट मान्य करतात की वैदिक साहित्याचा रचनाकाल इ.स.पू. २५०० - २००० हा होता. त्यापूर्वी वेद वाचिक परंपरेद्वारे सुरक्षित ठेवण्यात आले.



वैदिक काळात खगोल विज्ञानाला ज्योतिष म्हटले जाई. गुप्तकाळात वेदांच्या या खगोल विज्ञानाला भविष्य पाहण्याच्या विज्ञानात बदलण्यात आले, जे भारतासाठी दुर्भाग्याचे ठरले.
वेदांग ज्योतिष मध्ये सूर्य, चंद्र, नक्षत्र, सूर्यमालेचे ग्रह आणि ग्रहण यांच्या बाबत माहिती दिलेली आहे. वेदांच्या ज्योतिष अंगात संपूर्ण ब्रम्हांडाची गती आणि स्थिरता यांचे विवरण मिळते. आर्यभट्टने वेद, उपनिषद इत्यादींचा अभ्यास करून मगच सांगितले होते की पृथ्वी आपल्या परिघात राहून सूर्याला प्रदक्षिणा पूर्ण करते. आर्यभट्टने हे रहस्य विस्तारपूर्वक जगाच्या समोर ठेवले. त्यांनी पाचव्या शतकातच हे सांगितले होते की पृथ्वीला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३५६ दिवस ५ तास आणि ४८ सेकंदांचा वेळ लागतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel