प्राचीन काळी भारतात अनेक विश्व विद्यालये उपस्थित होती, जिथे जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. तिबेट, नेपाळ, श्रीलंका, अरब, यूनान आणि चीन इथून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असायची. प्राचीन काळातील तीन विश्व विद्यालयांचा उल्लेख मिळतो - तक्षशीला विश्वविद्यालय, नालंदा विश्वविद्यालय आणि विक्रमशीला विश्वविद्यालय.
तक्षशीला -
तक्षशिलाला विश्वातील पहले विश्वविद्यालय होण्याचा गौरव प्राप्त आहे. तर काही विद्वान नालंदाला पहिले विश्वविद्यालय मानतात. प्राचीन भारताच्या गांधार प्रांताच्या राजधानीचे नाव तक्षशीला होते. याच ठिकाणी इ. स. पू. ७०० मध्ये विश्वविद्यालय स्थापन करण्यात आले. वर्तमानात तक्षशीला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्ह्यातील एक तालुका आहे. आता इथे या विश्वविद्यालयाचे अवशेष केवळ शिल्लक आहेत.
तक्षशीला विश्वविद्यालयात जवळ जवळ १०,५०० भारतीय आणि परदेशी विद्यार्थी शिकत असत आणि त्यांना जवळपास २००० विद्वान शिक्षकांद्वारे विद्या प्रदान केली जात असे. एक गोष्ट उल्लेखनीय आहे ती म्हणजे पाणिनी, कौटिल्य (चाणक्य), चंद्रगुप्त, जीवक, कौशलराज, प्रसेनजीत इत्यादी महान व्यक्तींनी याच विश्वविद्यालयात शिक्षण घेतले.
असे म्हणतात की इथे ६० पेक्षा जास्त विषय शिकवले जात आणि इथे एक विशालकाय ग्रंथालय देखील होते. तक्षशीला नगराचा उल्लेख वाल्मिकी रामायणात देखील पहायला मिळतो. रामायणानुसार भारताच्या तक्ष आणि पुष्कर नावाच्या दोन पुत्रांनी तक्षशीला आणि पुष्करावती नावाची दोन नगरे वसवली होती. तक्षशीला सिंधू नदीच्या पूर्व तटावर होती.