http://apnisanskriti.com/wp-content/uploads/2015/08/hanuman.jpg

हनुमानाचा जन्म कसा झाला याविषयी देखील वेगवेगळी मते आहेत. एक मान्यता आहे की पुन्हा पुन्हा जेव्हा मारुतीने अंजनीला जंगलात पहिले तेव्हा तो तिच्यावर मोहित झाला. त्याने अंजनीशी संयोग केला आणि ती गर्भवती झाली. एक आणखी समजूत आहे की वायुने अंजनीच्या कानामार्गे शरीरात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली.
एका अन्य कथेनुसार जेव्हा राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचा त्याला जो प्रसाद मिळाला होता, तो आपल्या राण्यांमध्ये तो वाटत असताना त्यातला एक तुकडा एका गरुडाने उचलून नेला होता आणि त्या गरुडाने तो तुकडा जिथे माता अंजनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करत होती त्या जागेवर नेऊन टाकला. तो प्रसाद खाल्ल्याने अंजनी गर्भवती झाली आणि कालांतराने तिने हनुमानाला जन्म दिला. एका अन्य कथेनुसार कपिराज केसरी आपली पत्नी अंजना हिच्यासोबत सुमेरू पर्वतावर राहात होते. अंजनीला कोणतीही संतती नव्हती त्यामुळे त्यांनी पुत्र प्राप्तीच्या इच्छेने अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन वरदान देताना भगवान शंकराने त्यांना म्हटले होते की एकादश रुद्रांपैकी एक अंश त्यांना पुत्राच्या रूपाने प्राप्त होईल. शंकराने त्यांना जप करण्यासाठी एक मंत्र देऊन सांगितले की त्यांना पवन देवाच्या प्रसादाने एक सर्वगुणसंपन्न पुत्र प्राप्त होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel