लंकेत शिरताच त्याचा सामना लांकिनी आणि अन्य राक्षसांशी झाला ज्यांचा वध करून तो पुढे निघाला. तो सीता मातेचा शोध घेत घेत रावणाच्या महालात देखील घुसला, जिथे रावण झोपला होता. पुढे तो शोध घेत घेत अशोक वाटिकेत पोचला. हनुमानाने अशोक वाटिकेत सीता मातेची भेट घेतली आणि तिला रामाची अंगठी देऊन तिच्या शोकाचे निवारण केले. सीता मातेचा शोक निवारण होताच तिने म्हटले, "हे पुत्रा, तू अजर (वृद्धत्व विरहित), अमर आणि गुणांचा खजिना होशील. श्री रघुनाथ तुझ्यावर अनंत कृपा करोत." 'प्रभू कृपा करोत' हे ऐकताच हनुमान पूर्णपणे प्रेमात मग्न झाला. तेव्हा सीतामाता म्हणाली, "बाळा, जा आणि रामाला माझी खबर दे. त्या आधी जा आणि गोड फळे खा."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.