अभिज्ञान शाकुन्तलम' या नाटकामुळे कालिदासाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या नाटकाचे अनुवात जगातील अनेक भाषांमध्ये झालेले आहेत. त्याची अन्य नाटके 'विक्रमोर्वशीय' तथा 'मालविकाग्निमित्र' ही देखील उत्कृष्ट नात्य साहित्याचे नमुने आहेत. त्याची केवळ दोन महाकाव्य उपलब्ध आहेत - 'रघुवंश' आणि 'कुमारसंभव', पण तेवढी त्याची कीर्ती सर्वदूर पसरवण्यासाठी पुरेशी आहेत. काव्याकालेच्या दृष्टीने कालिदासाचे 'मेघदूत' अतुलनीय आहे. त्याची सुंदर, सोपी भाषा, प्रेम आणि विरहाची अभिव्यक्ती आणि प्रकृती यांच्यामुळे वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो. 'मेघदूत'चा देखील विश्वातील अनेक भाषांत अनुवाद झाला आहे. त्याचा 'ऋतू संहार' प्रत्येक ऋतूच्या प्रकृती चित्रणा साठीच लिहिलेला आहे. कालिदासाच्या काळाच्या विषयात अनेक मतभेद आहेत. परंतु आता विद्वानांच्या सहमतीने त्याचा काल इ. स. पु. पहिले शतक मानले जाते. याला कारण म्हणजे उज्जैन चा राजा विक्रमादित्य याच्या शासनकालाशी कालिदासाच्या रचनाकालाचा संबंध आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.