कालिदास संस्कृत भाषेतील सर्वांत महान कवी आणि नाटककार होता. कालिदासाने भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनाला आधार करून रचना केल्या. कालीदास आपल्या सुंदर, सरळ आणि मधुर भाषेसाठी खासकरून ओळखला जातो. त्याची ऋतू वर्णने अद्वितीय आहेत आणि त्याच्या उपमा अप्रतिम. संगीत त्याच्या रचनांचे प्रमुख अंग आहे आणि रसाचे सृजन करण्यात त्याला तोड नाही. त्याने आपल्या शृंगार रासाप्रधान साहित्यामध्ये देखील साहित्तिक सौदर्य आणि सोबतच आदर्शावधी परंपरा आणि नैतिक मूल्यांचे योग्य ते भान ठेवले आहे. त्याचे नाव अमर आहे आणि त्याचे स्थान वाल्मिकी आणि व्यास यांच्या परंपरेत आहे. कालिदास भगवान शंकराचे भक्त होते. कालिदास या नावाचा अर्थ आहे "काली चा सेवक". कालिदास दिसायला अतिशय सुंदर होता आणि राजा विक्रमादित्य याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. परंतु असे म्हटले जाते की सुरुवातीच्या जीवनकालात कालिदास अशिक्षित आणि मूर्ख होता. कालिदासाचा विवाह विद्योत्तमा नावाच्या राजकुमारीशी झाला होता.