इसाप ज्या माणसाच्या घरी गुलाम होता, तेथे एका कुंपणात काही कोंबड्या पाळलेल्या होत्या. त्यांच्याकडे तो एके दिवशी लक्षपूर्वक पहात बसला होता. इसापसारखा चतुर माणूस यःकश्चित् कोंबड्यांकडे पहात बसला आहे, हे पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले व त्यांचा एक घोळका तेथे जमा झाला. त्यांच्याकडे पाहून इसाप म्हणाला, 'ह्या मूर्ख कोंबड्यांचं अनुकरण माणसानं करावं याचं मला मोठं आश्चर्य वाटत !' लोकांनी विचारले, 'कोणत्या गोष्टीच अनुकरण ?' इसाप म्हणाला, 'ह्या कोंबड्या ज्या मानाने ओरडतात, त्या मानाने उकिरडा उकरण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही, आणि माणसही असंच करतात, कारण कामापेक्षा त्यांची बडबडच नेहमी अधिक असते.'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.