एक बोकड एका बागेत शिरला व एका फुलझाडांची पाने खाऊ लागला. तेव्हा ते झाड त्याला म्हणाले, 'अरे, कुरणातलं कोवळं गवत खायचं सोडून मला विनाकारण त्रास का देतोस ? तुला असं वाटतं काय की हे गरीब झाड आपलं काय करणार आहे ? पण तू लक्षात ठेव की, जेव्हा तुला देवापुढे बळी द्यायला नेतील तेव्हा तुझ्या गळ्यात जी फुलांची माळ घालतील तिला लागणारी फुलं मी देईन अन् तुझा सूड घेतल्याशिवाय कधीही सोडणार नाही !'

तात्पर्य

- माणूस कितीही दुर्बल असला तरी त्याला जर एखाद्याने विनाकारण त्रास दिला, तर त्याचा सूड काही प्रमाणात तरी तो घेतल्याशिवाय राहणार नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel