"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥"

भगवद्गीतेतील हा श्लोक. श्रीविष्णूंचे जगत्कल्याणासाठी दशावतार झाले. यातील सातवा श्रीराम अवतार आणि आठवा श्रीकृष्ण अवतार विशेष करून गाजले. मर्यादा, प्रेम, त्याग, वचन म्हणजे रामावतार सार्. तर तत्त्व, कर्म, धर्म, भक्ती यांनी कृष्णावतार सार. 

रामायण आणि महाभारत या दोन घटना कालातीत आहे. म्हणजे या घटनेवेळी सांगण्यात आलेले तत्त्वज्ञान, कर्ममार्ग, धर्ममार्ग, भक्तिमार्ग आजच्या काळातही तंतोतंत लागू पडताना दिसतात.

राम-कृष्ण नावात भारतीय संस्कृती सामावून गेली आहे.

जीवनाचे तत्वज्ञान उलगडत जातात राम -कृष्णाचे जन्म जगण्यातील भीषणता वास्तव मानवाल पटवून सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा अवतरीत झालेले मानवजन्माचे स्वरुप पण दैवी स्वरुपातील जगण्याचे आधार राम -कृष्ण जन्म.

प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी बारा वाजता रणरणते ऊन सूर्य नारायणाचे अस्तित्वसांगणारे ज्यात सावलीचा शोध घेत फिरणारे मानवी मन जणू आत्मा व्याकुळ झालेला, ह्रदय दु:खाने पिळवटून निघालेले असते  त्यावेळेसच रामचंद्र जन्म घेतात असे म्हटले तर...जगण्याच्या वास्तवाचे दर्शन

जसे दुःखानंतर सुख ऊन्हानंतर सावली  येते तसेच  मध्यरात्रीचा श्रीकृष्णाचा जन्म मग काय सांगते ती वेळ श्रीकृष्णाचा मध्यरात्रीचा जन्म तर मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात, यमुना दुधडी भरून वाहत असताना . जीवनात कृष्णपक्षाचा अंधार दाटला असताना, निराशेचे मनात  भरली असताना, डोळ्यांमधून आसवांच्या धारा वाहत असताना, सर्व मार्ग खुंटले असताना,  यमुना दुथडी भरून वाहू लागते. यावेळी श्रीकृष्ण जन्म घेतो.सर्व निराशेवर आशेचा एक किरण दिसू लागतो.मानवी जीवनाला खरे अर्थपूर्ण करतात राम-कृष्ण जन्म...सैरभैर मनाला स्थिर करतो हा श्रीकृष्ण जन्म असेही म्हणता येईल.

कारण 
आपल्या चंचल मनात हृदयात सतत अनेक प्रश्नांचा भावनांचा गोंधळ हल्लकल्लोळ माजलेला असतो
त्यामुळे रात्रंदिवस ह्रदयमंथन सुरू असते.याला समुद्रमंथनाची उपमा दिली तर समुद्र मंथन म्हणजे हृदयरूपी समुद्राचे मंथन. वासना व विकाराच्या लहरी या समुद्रात नेहमी आदळत असतात या मनरुपी मंथनात कधी प्रेम तरा कधी द्वेष यांचा हल्लकल्लोळ सतत होत असतो मन अशांत आसते जोपर्यत अमृतप्राप्ती म्हणजेच शांतता समाधान लाभत नाही. शरीराच्या गोकुळात यात गो म्हणजे इंद्रिये तर कुल म्हणजे समुदाय म्हणजे शरीर असा अर्थ घेतला तर इंद्रियावर ताबा द्वेष मत्सर यावर विजय मिळवत स्वतः इंद्रियांना काबूत ठेवणं असाही अर्थ श्रीकृष्णाच्या गोकुळाचा लावता येतो.

श्रीकृष्ण एक प्रवृती असे ही म्हणता येईल.सर्व इंद्रिये व प्रवृत्तींना महान ध्येयप्राप्तीसाठी प्रेरीत करून जीवनात स्थिरत्व प्राप्त करणेच जीवनाचे मुख्‍य कर्म .तर असा हा 
मानवाला नकळत परिपूर्ण करत जगण्याचे सार सांगतो हा श्रीकृष्णजन्माष्टमीचा दिवस.श्रीकृष्णाने कर्माचे महत्त्व गीते द्वारे सांगीतले आहे, आपल्या कर्तव्यामध्ये कधीही कसुर करू नये. हा संदेश समाजाला दिला.श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळांची किंवा कोणत्याही लाभची अपेक्षा ठेवू नये नक्कीच भगवान कृष्ण आणि त्यांनी जीवनात बिंबवलेली ही  कृष्ण नीती सर्वाच्या जीवनासाठी प्रेरणा ठरते 

मग मनाच्या गाभाऱ्यात उमटतो एक स्वर कृष्ण कृष्ण आणि कृष्णच...!!

श्रीकृष्ण जन्माचा असाही एक अर्थ काढता येईल का असे  माझ्या मनात आले. ते मांडण्याचा प्रयत्न ..!!

व्यक्तीसापेक्षता आदरच

©मधुरा धायगुडे
31आॕगस्ट2021
गोपाळकाला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel