फळांचा राजा अशी ओळख असणारे व आपल्या आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा होय.

आंबा या शब्दाचा उल्लेख मी केलेला "आंनदाने बहरलेला तो आंबा"..फळांचा राजा ..सध्याचा मौसम असाच बहरण्याचा लता वेली फळफुलांनी भारलेला वसंतऋतुचा..त्यात येणारा हा आंबा .सर्वदूर परिचित गोड चवीचा सुमधूर रसाचा आंबा...कालिदासाने केलेल्या निसर्ग वर्णनातही आम्रफळाचा वसंतातील या मोहोरोचा संदर्भ येतो.

विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारा वनस्पतीशास्त्रात याला "अश्मगर्मी "असे म्हणतात गराने व्यापलेले आत कठीण कवचाने आच्छादलेले फळ असे म्हणूयात...संस्कृत मधे आम तर इंग्रजीत mango असा हा आंबा एप्रिल ते जून या कालावधीत बहरणारा .....फुलातून फळात रुपांतरीत होताना केवळ फळाचे असामान्य महत्व पटवून देणारा आंबा .,,पण बहरतो तो त्याच्या मोहोरामुळेच...आंब्याचा मोहोर ...फुले...दाटीवाटीने पण छान पिवळसर झाक असलेली लालसर तु-यांनी शोभून दिसणारी आंब्याची फुले ...मोहोर..बदलत जातो आपले रुप....कच्च्या फळात रुपांतरीत होते ती कैरी .,,आंबट चवीची कैरी मोहोरापासूनची व्युत्पती आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे. कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. तेव्हा ही मोहोराने बहरलेली कैरी उपयुक्त ठरते.

आंब्याच्या झाडाला येणारा हा मोहोर फळाची गुणवत्ता गुणधर्म साठवण ठरवत असतो..मोहोर महत्त्वाचा त्याचे संगोपन फळाची महत्त्व ठरवते.

निर्णयसिंधुमध्ये 'आम्रपुष्पभक्षण' नामक एक विधी सांगितला आहे. यात 'फाल्गुन पौर्णिमेला आंब्याचा मोहोर खा' असं विधान आहे.वेद काळापासूनच आंबा या वृक्षाची पूजा होते आहे.रायवळ ही आंब्याची जात आहे. ही जात भारतात नैसर्गिकरीत्या आढळणारी याचे पूजन अशी प्रथा

अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत यूरोपातील लोकांनी भारतातून ही वनस्पती अन्य उष्णकटिबंधीय देशांत नेली.असे म्हणतात   भारतात टेकड्यांचे प्रदेश सोडून सर्वत्र आंब्याची लागवड होते.

आंब्याला धार्मिक महत्व  ही आहेच.कलशपूजन वंदनवार यालाच दाराचे तोरणही म्हणतात यात आंब्याची पाने लागतातच...आंब्याला फळाचा राजा म्हणतात आपले राष्ट्रीय फळ तर बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड म्हणून याचा उल्लेख होतो.

ज्योतिषशास्त्रात आंबा हा पूर्वाभाद्रपदा या नक्षत्राचा आराध्यवृक्ष ओळखला जातो.तर मोहोराचा रंग पिवळसर तयार होणारी कैरी गर्द हिरवा रंग घेते तर मध्यम पिकलेली केशरी लालासर मग पिवळसृर आंबा अशा बुध व बृहस्पति  ग्रहांच्या अमंलाखाली तर शुक्र चवीचा गोडवा घेवून चवीचा जिव्हाळा जपतोच...चैत्र चैतन्य वसंत आनंद पसरवणारा यात येते ती चैत्र गौर तिच्या स्वागाताला हा सज्ज होतो कैरी डाळ कैरी पन्हे चवीचा जिव्हाळा जपत जपत....चैतन्य पसरवतो.

मानवाच्या जगण्याचा मतितार्थ सांगणारा हा आंबा .जसे  ..
चिकूचे बी फळात राहूनही, फळ पक्व झालं की, त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे.
आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी, रसातून अलग होत नाही. परिणाम, तिलाही लोक, पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही.
म्हणून, चिकूच्या बी सारखं वागावं, सगळ्या मोहजालात राहूनही, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं. कोयीसारखं माया रूपी रसात गुरफटून रहाल, तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत. पिळायच्या आधीच बाहेर पडावं.

मग आहारातही या आंब्याचे स्थान वरचढच सदाहरित वृक्षात या आंब्याची गणना होत असली तरी एकदाच येणारे हे फळ याचे महत्त्व आहेच

. आंबा हा आहार व औषध अशा दोन्ही दृष्टीने बहुमोल आहे.
आपल्या परिसरात, झाडावरच पिकलेला आंबा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक असतो. आंबा हा नेहमी ताजा खावा व शक्यतो आंबा कापून खाण्यापेक्षा चोखून खावा.  कारण कापून खाल्लेला आंबा हा पचनास जड तर चोखून खाल्लेला आंबा हा पचण्यासाठी सुलभ व हलका असतो. आंबा हा हिरवट पिवळा, गुलाबी पिवळा व हिरवा अशा रंगांमध्ये पाहावयास मिळतो.
कैरी व आंबा या दोन्ही अवस्थांमध्ये या फळात औषधी गुणधर्म सापडतात. ते कोणते ह्याचे वर्णन आपल्याला परिचितच ...अ जीवनसत्व भरपूर अग्रमानांकित आंबा..
मात्र ..मी उल्लेख करेन तो फक्त ....असा कि..,,.
मधुमेह असणाऱ्यांनी, अतिलठ्ठ व्यक्तींनी आंबा खाऊ नये किंवा अगदी कमी प्रमाणातच खावा. कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते.  कच्च्या कैऱ्या फार खाऊ नयेत, त्यामुळे घशात खवखव व अपचन, जुलाब, पोटदुखी या तक्रारी उद्भवतात. सध्या तर हे धोकादायक कोरोना इफ्केट ....

थोडक्यात काय हा सर्व गुणसंपन्न राजवर्खी राजाश्रय लाभलेला आंबा ....सर्व सन्मानास पात्र असाच. .जरुर खावा वर्षातून एकदातरी  पण प्रमाणात आस्वाद घेत हळूवार चव रंग गंध रस याची संवेदना जपत ...अन्नपूर्णेचा आशिर्वाद घेत ...तर त्याचा खरा फळांचा राजा म्हणून सन्मान होईल..आंबा आवडत नाही असा विरळाच ..लाखात एक...

.मग त्याचे प्रकार.....प्रदेश...पदार्थ ....पद्धत...या सर्वपरिचित त्यात न पडता  सूर्याची लालिमा पिवळसर प्रकाशाच्या कोवळ्या किरणांचा रंग ल्यालेला दाट रसदार सुमधूर आंब्याचा आस्वाद घेत घेत लाँकडाऊन चिंतन पुन्हा नव्याने करुयात...क-.करोनाला ही हरवूयात....देवदर्शी असे हे फळ आंबा ...तृप्तीची कृतार्थता क्षणभर का होईना मिळवून देणारा..सर्वजनी सहज उपलब्ध होवो...फळांचा राजा म्हणताना रंका पर्यत पोहचण्याचे सामर्थ्य ठेवणारा आंबा .एक दैवी फळ....!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel