मानवी नातेसंबंधांतील सर्वात भयंकर धोका  अडचण हा गैरसमज....

मन आणि गुंतागुंत याचा तिढा हा गैरसमज....नकारात्मक शब्द नको त्या गोष्टी वर ठेवलेला विश्वास स्वतःच्या आनंदासाठी चुकीच्या व्यक्ती ..गोष्टी ..यांना दिलेले प्राधान्य यामुळे बळावलेला हा गैरसमज...

संवादाचा अभाव...दोन व्यक्ती ना न समजलेलं उमगलेलं भिन्न चर्चेतून उद्भवलेलं संकट गैरसमज.....कि न मिळालेलं यश :काही मिळविण्यासाठी एखाद्याचा केलेला वापर त्यातून निर्माण झालेली अवस्था गैरसमज.....

गैरसमजामुळे व्यक्तीची मानसिकता, 'स्व'त्वाच्या कल्पना, करीअर व परस्परसंबंधांतील सौख्य,  विश्वास, आपुलकी यांना झळ पोहोचते. त्यांच्यात दुरावा  निर्माण होतो भांडणे होतात. त्याने प्रगती खुंटते.याला जबाबदार..चुकीच्या गोष्टीना आपण दिलेली साथ कि ...!

मुद्दाम केलेले दुर्लक्ष  अनावधान यामुळे तो बळावतो एखाद्या ने सांगितलेल्या प्रसंगाचा लावालेला चुकीचा अर्थ विसंवाद हे याला खतपाणी घालू शकतात..वेळीच ते दूर करणं अपेक्षित ठरतं

गैर चुकीचे समज ..भावना मनाची एक स्थिती गैरसमज..

एका जंगलात राम-सावित्री नावाच एक जोडपं राहत असत,राम हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...
काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरले मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती.
राम त्या पिल्लाला घरी आणतो.
थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस राम नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो...
नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून  सावित्री  पाणी आणण्यासाठी निघून जाते.
घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस...
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला...
मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई...
साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने माखले होते...

आता मुंगूस दारात उभे राहून सावित्रीची वाट बघत होते...

तेवढ्यात सावित्री डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय...???

मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते

सावित्रीच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...

पण मुंगूस मात्र सावित्रीकडे खूप निरागसपणे बघत होते

मात्र त्याचवेळी सावित्रीने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला...
आणि
क्षणार्धात डोक्यावरील हांडा तीने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला
आणि....
घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत.
आणि
शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला...
सावित्री भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झाले होते..

सावित्रीने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

आपण जे दिसतय ते बघत नाही
पण त्याचाआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करत राहतो ,कारण प्रश्न हा जीवलग माणूस गमवण्याचा असतो

गैरसमज हे जवळच्या  माणसाबद्दल होतात कधी करुन दिलेले तर कधी ओढावलेले, आणि...ते गैरसमज वेळ निघून गेल्यावरच दुर हाेतात...!!* स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय व कानाने ऐकल्याशिवाय विश्वास ठेवणं घातकच...एखाद्या चांगल्या व्यक्ती ला गमावण्याचे दुखावण्याचे पाप आपल्या खात्यात येवू शकते तर कधी .ती दुरावू शकते....

वेळेची तमा न बाळगणारा मनामनांना कायमचा तोडणारा हा गैरसमज आज प्रत्येक घरात थोड्याफार प्रमाणात नांदत असेलच ...तो वेळीच दूर संवादाने नाही झाला तर कायमचा विसंवाद होत मानवी भावनांना कलुषित करत जातो....कायमचा..,.!!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel