प्रिय मैत्रीण

माफ कर तुला कदाचित जुन्या आठवणींना उजाळा देताना त्रास झाला असेल.... हे असं असतं. म्हणजे, बघं ना जोवर तू माझ्याशी एका विशिष्ट बाजूने व्यक्त होत होती तोवर कितीतरी आनंदी व उत्साही होतीस. पण जरा कुठे तू इतर बाजूंचा विचार करण्याची गोष्ट समोर आणली तर लगेचच खाजगी आयुष्यातली दुःख पुन्हा मध्ये येऊन उभी ठाकली. मी सहजच म्हणून विचारलं होतं तुझ्या आईबाबांबद्दल पण तुझे वडील हयात नाहीत, हे ऐकून फार वाईट वाटलं. पण सोबतच तुझ्या आई सारख्या स्त्रियांबद्दल अभिमान वाटला. ज्याप्रमाणे तुझ्या आईने तुला आणि तुझ्या मोठ्या भावाला एका राणी आणि राजकुमाराप्रमाणे वाढवलं ते खरोखरच उल्लेखनीय होतं. आईची जिद्द म्हणजे, अख्ख्या ब्रह्मांडाला पुरून उरेल एवढी प्रबळ असते. तिच्या जिद्दीपुढे सर्वच गोष्टी शून्य. मायेचा तोच पदर जेव्हा सचोटीवर उतरतो तेव्हा इतिहास घडतोच घडतो. तुझ्या आईंना माझा नमस्कार सांग.....

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel