प्रिय मैत्रीण

आज पाऊस पडला तुला सांगतो मी पावसात अक्षरशः तुझ्या प्रतिमेची कल्पना करत होतो. हो खरंच! तू पावसात भिजताना माझ्याशी केवढा महत्त्वाचा संवाद साधलास आज. जे काही पावसातल्या तुझ्या प्रतिमेने मला सांगितलं ते खरं आहे की नाही? हे पत्र लिहून तूच कळवं मला आता. पण तुला एक मित्र म्हणून सांगतो, आयुष्यात तुला कितीही संघर्ष करावा लागला ना तरी कधी कुठेच कमी पडू नकोस. कारण मी जेवढा तुला जाणतो तेवढी तू नक्कीच सक्षम नक्किच आहेस. मीही तुझ्या सोबत कायम असेन. काही दिवसांपूर्वीचा एक किस्सा सांगतो, मला माझ्या घरच्यांनी वेडेपणाचा शिक्का मारला आहे. कारण त्यांच्या लेखी मी अशा मैत्रिणीला पत्र लिहितोय जी मुळात अस्तित्वात नाही. पण आता त्यांना समजावणं अर्थार्थी उपयोगाचही नाही. असू दे! मी तुझ्याकडून येणाऱ्या पत्रात तुझ्या वेदनेच रूप पाहू इच्छित आहे. कारण तू वेदनेला मोकळी वाट करून देशील तरच ती कमी होईल. आणि तुझा ताणही जाईल. वाट पाहतोय तुझ्या पत्राची.

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel