प्रिय मैत्रीण

आता मी पत्र कोरच पाठवलेलं बरं राहिलं असतं; पण तसं नको. तू हा प्रश्न विचारलास यात तुझी काहीच चूक नाही. माझ्या प्रेमाबद्दल विचारणारी तशी तू पहिलीच नाहीस. पण तरीही सांगतो, माझं प्रेम कदाचित अर्धवट म्हणू शकतेस तू. कारण तिचं कधी माझ्यावर प्रेम झालंच नाही. तुला सांगतो, अगदी पाच वर्ष केवळ तिच्या होकाराची वाट पाहण्यात घालवली. एक-दोन वेळा माहित नाही कसा पण तिच्यासोबत वादही झाला. दरवेळी नवीन नंबर वरून माझा ठरलेल्या त्या 18 मार्च या तारखेला तिला प्रपोज असायचाचं. एकदा तिने घडलेल्या गोष्टी विसरून मी म्हटल्याप्रमाणे मैत्रीचा हातही पुढे केला होता. मला वाटलं की, ती आपली मैत्रीण झाली म्हणजे तिच्याशी फार व्यवस्थित बोलता येईल, तिला आनंदी ठेवता येईल. पण ती पुन्हा रागात बोलून गेली मी अगदीच निर्लज्ज होतं ना....! सतत तिच्याकडून अपमान झाला तरी तिचीच मदत करायची सवय लागली होती. मला मला फक्त प्रेम द्यायचं एवढंच माहीत होतं. आणि मी पुरेपूर मनातून सर्वकाही योग्यच दिलं पण ती सर्व विसरली होती. ती निश्चिंत स्वैर पक्षी होती. जाऊ दे यार! कोणासाठी माझ्या डोळ्यात पाणी उभ राहिलयं?

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel