मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयाय ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते व तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते 


मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या ! तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच ! 

ख्रीस्ती बांधव , पारशी लोक , इस्लामीक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते . ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही !

अगदी प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो  . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतू त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात . ( हे सर्व मी नाही संशोधकांनी सिद्ध केले आहे ज्यावर डीस्कव्हरी या चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.

या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्यान आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा ! 


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel