बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतोच असतो . याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ , व १२ वा एकत्र वा वेगवेगळा , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही . यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही ! परंतू या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत . या नंतर करतात तेरावा . व नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात . या वेळीही अब्दपूरीत व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करत नाहीत . तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तिर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या पानांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही ! तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ढरतात . आता आपण अंत्येष्टीतील विधी जाणून घेऊत व नंतर क्रमाने पितरांचा त्रास नेमका कसा ओळखावा व त्यावरील उपाय काय ते दररोज जाणून घेऊत .