आपल्या सर्वाना माहित आहे की युगांचे आपले निर्धारित स्थान आहे -
१. सतयुग
२. त्रेतायुग
३. द्वापरयुग
४. कलियुग
परंतु संस्कृत मध्ये द्वापार चा अर्थ आहे दुसरा आणि त्रेता म्हणजे तिसरा. तर त्रेता युग द्वापार युगाच्या आधी कसे येऊ शकते? याच्या मागे देखील कहाणी आहे. सतयुगात अहिल्या नावाच्या सुंदर तरुणीने गौतम ऋषींशी विवाह केला. अहिल्या दिसायला अप्रतिम सुंदर होती. त्यामुळे इंद्रदेव तिच्यावर भाळला होता. एकदा नेहमीप्रमाणे गौतम ऋषी स्नानासाठी म्हाणून बाहेर गेले आणि इंद्र त्यांच्या कुटीजवळ आला. इंद्राने गौतम ऋषींचे रूप घेतले आणि अहिल्याच्या जवळ गेला. अहिल्या इंद्राला ओळखू शकली नाही.
इंद्राने अहिल्येबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिथून निघून जात असताना आपल्या खऱ्या रुपात आला, त्याच वेळेस गौतम ऋषींनी त्याला पहिले. त्यांनी आत जाऊन अहिल्येवर आगपाखड केली. त्यांनी अहिल्येला शाप दिला की तिचा दगड होईल.
शिळेत रुपांतर झाल्यानंतर अहिल्येने गौतम ऋषींना वस्तुस्थिती सांगितली आणि आपली सुटका करण्यास सांगितले. ऋषींना तिची दया आली आणि त्यांनी तिला उश्याप दिला की त्रेता युगात विष्णूचे अवतार प्रभू श्रीराम या शिळेला आपल्या पायांनी स्पर्श करतील आणि तिची सुटका होईल.
अहिल्या म्हणाली की आत्ता तर सतयुग चालू आहे, जे १००० वर्षांनी संपेल. त्यानंतर द्वापार युग येईल जे लाख वर्ष मोठे आहे. आणि त्यानंतर त्रेतायुग सुरु होईल. इतका काळ तिने दगड बनून कसे राहावे? तिची विनवणी ऐकून गौतम ऋषींनी युगांचे स्थान बदलले. त्यांनी कालचक्र अशा रीतीने फिरवले की त्रेतायुग द्वापार युगाच्या आधी आले.