आपला भारत देश विविधतेने नटलेला आणि विविध परंपरेने सजलेला आहे.  आपल्या देशात विविध सण त्या त्या धर्माच्या परंपरेनुसार साजरे केले जातात. आपले सण व्रतवैकल्ये म्हणजे आपली संस्कृती.  आजच्या युगात विज्ञानाने प्रगतीचे उच्च शिखर गाठले आहे.  तरीही आपण संकटकाळी देवाचाच धावा करतो.  उदा.  आपल्याला ज्ञात आहे प्रदूषणामुळे दुष्काळाचे प्रमाण सतत वाढत चालले आहे तरीही आपल्या ओठी सहज शब्द येतात, "देवा आता तरी पाऊस पाड"

आपणच प्रक्रुतीच्या नियमांच्या विरुध्द जाऊन रस्ते रुंदीकरणासाठी डोंगर फोडू लागलो झाडे तोडू लागलो.  विविध औद्योगिक कारखानांचे वाढते प्रदुषणामुळे पावसाचे प्रमाण घटत चालले आहे .  तरीही मनात कुठेतरी एक आशा असते देवाच्या क्रुपेची.  डॉक्टर सुद्धा ऑपरेशनच्या वेळी पेशंटच्या नातेवाईकांना धीर देतांना म्हणतात, "मी माझ्यापरीने पूर्ण पयत्न करेल पेशंट ला वाचवण्यासाठी बाकी सर्व परमेश्वराच्या हाती" यावरुन स्पष्ट होते विज्ञानाने प्रगतीची उच्च शिखरे गाठली तरी आपण देवा कडे मोठ्या आशेने पाहत असतो.

देवाला मानणारे  म्हणजे त्याच्या वर श्रद्धा ठेवणारे आणि त्याच्या कडून अपेक्षा ठेवणारे.  देवाला न मानणारे लोक म्हणजे देवा कडून कसलीच अपेक्षा न बाळगणारे लोक आपल्याला पहायला मिळतात.  

ज्या भक्तीत निस्वार्थ प्रेम आणि विश्वास असतो  तेच श्रध्देचं खरं रुप.  ज्या भक्तीत स्वार्थ आणि भीती लपलेली असते ते अंधश्रध्देचं रुप.
ईश्वरावर मनापासून प्रेम करणारे अनेक भक्त होऊन गेले आहे.  त्यांना आपण संत म्हणून आजही पूजतो.   संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई अशी अनेकानेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.  ईश्वरावर त्यांचे नितांत प्रेम होते. त्या प्रेमा पोटी त्यांनी अनेक यातना सहन केल्या.  पण त्या यातनांची कधी ईश्वराजवळ तक्रार केली नाही.  उलट ईश्वरावरील प्रेमाच्यामुळे त्यांच्यातील सहनशीलतेचे प्रमाण अधिकाधिक वाढतच गेले.  संकटांना कधीही घाबरले नाही.  ईश्वराधाना हेच त्यांचे जीवन बनले.  

आपण ईश्वरावर मनापासून विश्वास ठेवला तर आपल्याला संकटांचा सामना कळण्याचे बळ मिळते.  ही श्रध्दा अध्यात्म अध्ययनातून निर्माण होत असते.   

अंधश्रद्धा ही आपल्या मनातील भीतीपोटी आणि स्वार्थापोटी निर्माण होत असते.   अंधश्रद्धा हे कमजोर मानसिकता आणि मानोविकाराचे लक्षण मानले जाते.  जसे रस्त्यावर  चालतांना मांजर आडवे गेले  तर अपशूकन समजला जातो.  आता रस्ता सर्वांसाठी आहे मांजरासाठी ही आहे आणि आपल्यासाठीही आहे. मांजराच्यामनात येत नाही मनुष्य आपल्याला आडवा गेला मला अपशूकन झाला.  विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर मांजराच्या मनात भीती नसते मनुष्याविषयी तर मनुष्याच्या मनातच का अपशकुनाची भीती असावी.   

अश्याप्रकारच्या अनेक अंधश्रद्धा मानवाच्या मनात आजही घर करुन आहेत.  याचाच फायदा अनेक प्रकारचे भोंदूबाबा घेत असतात.  टेबलावरचा टिव्ही आपण खिशात घेऊन फिरतो.  पण आजही कमजोर मन भोंदू बाबांच्या भोंदूगिरी ला बळी पडतांना दिसते .

आजही संतती साठी,  आर्थिक प्रगतीसाठी भोंदूबाबा च्या दारी जाणारे लोक आपल्याला पहायला मिळतात.  त्या अशिक्षित लोक असतात पण सुशिक्षित लोक सुद्धा याला अपवाद नाहीत.  अंगात देवीदेवता येतात असे भासवून लोकांची फसवणूक करणारे भोंदूबाबा आजही समाजात वावरताना आढळतात.  

मुक्या जनावरांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करण्याचा आव आणणारे भोंदू बाबा आपल्याला पहायला मिळतात.  देवाला आपण माय बाप म्हणून हाक मारतो.  मग तो भूतलावरील प्रत्येक प्राण्याचा मायबाप आहे. हे तर सर्व मान्य आहे.  मग एका लेकराच्या सुखासाठी दूसऱ्या लेकराच्या जीवाचा बळी कसा स्वीकारेल ?  विचार करण्यासारखी बाब आहे.  याला कुठेतरी आळा बसला पाहिजे.  

डॉ नरेंद् दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मुलन समिती स्थापन केली.  अंधश्रद्धा विरोधी कायदा व्हावा निर्पराध जीवांचा प्राण वाचावा यासाठी 16 वर्ष लढा दिला.  त्या साठी त्यानी आपल्या जीवाचे बलीदान दिले.  तरीही आजही काही लोक अंधश्रध्देला बळी पडतांना दिसतात.  

जर एखाद्या व्यक्तीवर संकट आले तर देवच्या आधि पूरोहित आठवतात.  मग जन्म पत्रीका पाहिली जाते.  संकट मग काहीही असो,  पूरोहितांचे उपाय ठरलेलेच असतात.  नारायणनागबली,  ग्रहशांती,  आणि नवचंडी यज्ञ आणि कालसर्पशांती,  मला एक कळत नाही,  सर्पाचा आणि ग्रहांचा आपल्या संकंटांशी काय संबंध ? ग्रह तारे निमुटपणे आकाशातून खालची गंमत पाहत असतात .  सर्प मुका प्राणी कसा कुंडलीत शिरतो ? समजतच नाही.  मुला मुलीला मंगळ कसा लागतो ? हेच मला कळत नाही,  आणि  शनीचीच साडेसाती का असते ?.  त्यावरचा उपाय पण हास्यास्पद  सांगितला जातो.  मुलीला मंगळ यंकर आहे.  तीचे लग्न मडक्याशी लावा म्हणजे अनिष्ट टळेल.  काय ते उपाय सुचवतात.  आणि लोक भीतीपोटी तसे करायला तयार होतात

विश्वास देवावर ठेवा  देवाचा बाजार मांडलेल्यांवर नाही.  आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा.  आणि स्वबळावर विश्वास ठेवा  म्हणजे संकटातून सहज मार्ग सापडेल.

कोणाचे वाईट करु नये, कोणासाठी वाईट चिंतन करू नये. हीच आपल्या संतांची शिकवण ध्यानी ठेवा.  म्हणजे काहीही वाईट घडणार नाही.  आणि आलेल्या संकटांना सकारात्मक द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्कीच सापडेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel