juilyatitkar@yahoo.in
8655778845


आकाशात बरसणारा,  विजेशी खेळणारा
जमिनीत मुरणारा,  सुखावणारा पाऊस
कधी गडगडणारा,  सडेतोड पडणारा
नुसताच रिपरिपणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 
कधी किनाऱ्याने वाहणारा,  सोबत होड्याना नेणारा
कधी  थरारक भासणारा हा पाऊस
रंग बेरंगी छत्र्यांनी रंग भरणारा
उत्साही वाटणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 
कधी पाण्यासाठी रडवणारा,  पाण्यामुळेच हसवणारा
अश्रुनी भिजवणारा, झिजवणारा हा पाऊस
पाण्यापाईच मारणारा अन त्यातूनच तारणारा
सृष्टीला जागवणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 
कधी प्रेमात रंगणारा, कळीतून फुलणारा
कधी सौंदऱ्याने सजणारा असा हा पाऊस
कधी ओशाळलेल्या मायेचा, नात्याची ऊब देणारा
बेधुंद बरसणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 थंडगार वाऱ्यावरती मनमुराद नाचणारा
डोंगरमाथ्यावरून कधी तृप्तीने कोसळणारा
चिंब भिजवून निथळणारा
हवाहवासा वाटणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 
खिडकीतून नुसते नयन सुख देणारा
भिंतीच्या कोपऱ्यातून नुसताच ठीपकणारा पाऊस
चिखलाने बरबटणारा
आडोशासाठी वळवणारा. माझ्या मनातला पाऊस ||
 
कोसळून कोसळून सारेच वाहून नेणारा
अचानक गुडूप होऊन काळजाला भेगा देणारा पाऊस
तरीही येताना आनंद घेऊन येणारा
असा अनप्रेडिक्टेबल. माझ्या मनातला पाऊस ||
 
आहे पूर्वीचाच पण नव्याने समजणारा
प्रत्येक थेंबातून जगणं  शिकवणारा पाऊस
एकच विनंती आहे तुला. भावनांचा ओलावा आटला
तरी बाबा कधी दूर नको जाऊस
असाच राहावा माझ्या मनातला पाऊस ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel