http://religious.jagranjunction.com/files/2016/06/shakuni.jpg

शकुनी गांधार नरेश राजा सुबाल याचे पुत्र होते. त्याचा जन्म गांधार राजा सुबाल याच्या राजप्रासादात झाला होता. तो माता गांधारीचा लहान भाऊ होता. जन्मापासूनच त्याची बुद्धी विलक्षण होती आणि त्याच्यावर राजा सुबाल याचे निरतिशय प्रेम होते.
अनेक छोटे छोटे प्रांत मिळून आर्य क्षेत्र बनले होते. या क्षेत्रातच गांधार राज्य होते. आजच्या उत्तर अफगाणिस्तानला त्या काळात गांधार म्हटले जाई, जे कम्बोज जवळ  होते. गांधार राज्यातच हिंदुकुश पर्वतमाला होती. कंदाहर किंवा कंधार हा गांधारचाच अपभ्रंश आहे. कौरवांना कपटाचा मार्ग शिकवणारे शकुनी त्यांना पांडवांचा विनाश करण्यासाठी पदोपदी मदत करत होते, परंतु त्यांच्या मनात कौरवांबद्द्ल केवळ सूडाची भावना होती.
त्या काळी गांधार राजकुमारीच्या रूप लावण्याची चर्चा संपूर्ण अर्यवर्तात होती. अशात पितामह भीष्म यांनी धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकुमारीशी करण्याचा विचार केला. आधी त्यांनी ठरवले होते की गांधार राजकुमारीचे अपहरण करून आणावे, परंतु अम्बा आणि अम्बालिका यांनी त्यांना तसे करण्यास विरोध केला. त्यामुळे भीष्म पितामह गांधारच्या राज्यसभेत धृतराष्ट्राच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले, परंतु त्यांना मीहिती होते की त्यांचा प्रस्ताव ठोकरला जाणार आहे.
तेव्हा भीष्मांनी क्रोधाने सांगितले की मी तुझ्या या छोट्या राज्यावर आक्रमण करीन आणि त्याला समाप्त करून टाकीन. शेवटी राजा सुबाल याला भीष्मांच्या पुढे मान तुकवावी लागली आणि अत्यंत क्षोभाने आपल्या सुंदर कन्येचा विवाह अंध राजकुमार धृतराष्ट्र याच्याशी करून द्यावा लागला.
गांधारीने देखील दुःखाने आजीवन डोळ्यांवर पट्टी बांधून घेण्याची प्रतिज्ञा केली. गांधारीपासून महाराज धृतराष्ट्र यांना १०० पुत्रांची प्राप्ती झाली जे पुढे जाऊन कौरव या नावाने प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात ते कौरव नव्हते.
मान्यता आहे की गांधारीचा विवाह धृतराष्ट्राशी करण्यापूर्वी ज्योतिषांनी सल्ला दिला की तिच्या पहिल्या विवाहावर संकट आहे, तेव्हा तिचा पहिला विवाह अन्य कोणाशी करून द्या, मग धृतराष्ट्राशी करून द्या. त्यामुळे ज्योतिषांच्या सांगण्यावरून गांधारीचा पहिला विवाह एका बकऱ्याशी लावण्यात आला होता. नंतर त्या बकऱ्याचा बळी देण्यात आला.
असे म्हटले जाते की गांधारीला कोणत्या तरी प्रकोपापासून मुक्त करण्यासाठी ज्योतिषांनी तसा सल्ला दिला होता. या कारणामुळे गांधारी प्रतिक रूपाने विधवा मानली गेली आणि नंतर तिचा विवाह धृतराष्ट्राशी करून देण्यात आला. असे केले यामागे आणखी देखील कारणे होती.
गांधारी एक विधवा होती ही गोष्ट बराच काळ कौरव पक्षाला माहिती झाली नाही. जेव्हा ही गोष्ट महाराज धृतराष्ट्राना समजली तेव्हा ते अत्यंत क्रोधीत झाले. त्यांना वाटले की गांधारीचा आधीच कोणाशी तरी विवाह झाला होता आणि कोणत्या तरी कारणाने तिचा पहिला पती मारला गेला.
धृतराष्ट्राना या गोष्टीचे वाईट वाटले आणि त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण दोषी गांधारीचे पिता राजा सुबाल यांना मानले. त्यांनी गांधारीचे पिता राजा सुबाल यांना संपूर्ण परिवारासहित कारागृहात डांबले.
कारागृहात त्यांना खाण्यासाठी केवळ एका व्यक्तीचे जेवण देण्यात येत असे. असे केवळ एका व्यक्तीच्या जेवणाने सर्वांचे पोट कसे भरले असते? ही संपूर्ण परिवाराला उपाशी मारण्याची चाल होती. राजा सुबालने निर्णय घेतला की हे भोजन केवळ त्याच्या सर्वांत छोट्या पुत्रालाच देण्यात येईल जेणेकरून परिवारातील एक तरी व्यक्ती जिवंत राहील.
एक एक करून सुबालचे सर्व पुत्र मरू लागले. सर्व जण आपल्या हिश्शाचे अन्न सर्वांत लहान भावाला देत असत जेणेकरून तो जिवंत राहून कौरवांचा नाश करू शकेल. सुबालने आपल्या सर्वांत लहान पुत्राला बदला घेण्यासाठी चांगले तयार केले. मृत्युपूर्वी सुबालने धृतराष्ट्राला विनंती केली की माझ्या सर्वांत लहान पुत्राला सोडून द्या, जी विनंती धृतराष्ट्राने मान्य केली.
राजा सुबाल याचा सर्वांत छोटा पुत्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हे, तर शकुनी होता. शकुनीने आपल्या डोळ्यांसमोर आपला परिवार झिजून झिजून मारताना पाहिला आणि शेवटी स्वतः जिवंत राहिला.
जेव्हा कौरवांचा वरिष्ठ युवराज दुर्योधनाने पहिले की केवळ शकुनी जिवंत बचावला आहे, तेव्हा त्याने पित्याच्या आज्ञेने त्याला क्षमा करून आपल्या देशाला परत जाण्यास सांगितले किंवा हस्तिनापुरातच राहून आपले राज्य पाहण्यास सांगितले. शकुनीने हस्तिनापुरात राहण्याचा निर्णय घेतला. शकुनीने अल्पावधीतच हस्तिनापुरात सर्वांचा विश्वास संपादन केला आणि १०० कौरवांचा सल्लागार बनून राहिला. त्यांचे विश्वासार्ह कार्य पाहून दुर्योधनाने शकुनीला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले.
सर्वप्रथम त्याने गांधारी आणि धृतराष्ट्र यांना वश करून धृतराष्ट्राचा भाऊ पंडू याच्या विरुद्ध षड्यंत्र रचण्यास आणि राजसिंहासनावर धृतराष्ट्राचे आधिपत्य जमवण्यास सांगितले. मग हळूहळू शकुनीने दुर्योधनाला आपल्या बुद्धीच्या मोहपाशात बांधून घेतले. शकुनीने केवळ दुर्योधनाला युधिष्ठिराच्या विरुद्ध भडकवले नाही तर महाभारताच्या युद्धाचा पाया देखील रचला.
ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहित असेल की शकुनीजवळ जे द्यूत खेळण्याचे फासे होते ते त्याच्या मृत वडिलांच्या मणक्याच्या हाडांचे बनलेले होते. आपल्या वडिलांच्या मृत्यू नंतर शकुनीने त्यांची काही हाडे स्वतःजवळ ठेवली होती. शकुनी द्यूत खेळण्यात अतिशय पारंगत होता आणि त्याने कौरवांना देखील जुगाराचा नाद लावला होता.
शकुनीच्या या खेळीच्या मागे केवळ पांडवांचाच नव्हे तर कौरवांचा देखील भयंकर विनाश लपलेला होता, कारण शकुनीने कौरवांच्या कुळाचा नाश करण्याची शपथ घेतली होती आणि त्यासाठी दुर्योधनाला आपला मोहरा बनवले होते. शकुनी नेहमीच केवळ संधीच्या शोधात असायचा जेणेकरून कौरव आणि पांडव यांच्यात भयंकर युद्ध होईल आणि कौरव मारले जातील.
जेव्हा युधिष्ठीर हस्तिनापूरचा युवराज घोषित झाला, तेव्हा शाकुनिनेच लाक्षागृहाचे षड्यंत्र रचले आणि सर्व पांडवांना वारणावत मध्ये जिवंत जाळून मारून टाकण्याचा पयत्न केला. शकुनी कोणत्याही प्रकारे दुर्योधन हस्तिनापूरचा राजा होईल हे पाहत होता जेणेकरून दुर्योधनावर त्याचे मानसिक आधिपत्य राहील आणि तो या मूर्ख दुर्योधनाच्या सहाय्याने भीष्म आणि कुरुकुलाचा नाश करू शकेल. तेव्हा त्यानेच दुर्योधनाच्या मनात पांडवांच्या विषयी वैरभाव जागवला आणि त्याला सत्तेचा लालसी बनवला.
शाकुनिमुळेच महाराज धृतराष्ट्र यांच्या तर्फे पांडव आणि कौरव यांच्या होणाऱ्या विभाजनानंतर पांडवांना एक ओसाड पडलेले क्षेत्र सोपवण्यात आले, परंतु पांडवांनी आपल्या मेहनतीने त्याचे इंद्रप्रस्थात रुपांतर केले. युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधनाला हे नगर पाहण्याची संधी मिळाली.
महालात प्रवेश केल्यानंतर एका विशाल कक्षात पाण्याच्या त्या जमिनीला दुर्योधन खरी जमीन समजला आणि त्याने त्यावर पाय ठेवला आणि तो त्या पाण्यात पडला. हे पाहून पांडवांची पत्नी द्रौपदी त्याला हसली आणि म्हणाली की एका अंधाचा पुत्र अंधच असतो. हे ऐकून दुर्योधन खूप क्रोधीत झाला.
दुर्योधनाच्या मनात उसळलेल्या सुडाच्या या अग्नीला शकुनीने हवा दिली आणि त्याचाच फायदा घेऊन द्यूत खेळण्याची योजना आखली. त्याने आपली योजना दुर्योधनाला ऐकवली आणि सांगितले की द्यूतात त्यांना हरवून तू बदला घेऊ शकतोस. खेळाच्या माध्यमातून पांडवांना मात देण्याच्या हेतूने शकुनीने अतिशय प्रेमळपणाचा आव आणून पांडवांना आमंत्रित केले आणि मग सुरु झाला दुर्योधन आणि युधिष्ठिराच्या दरम्यान द्यूताचा तो ऐतिहासिक खेळ...
शकुनी एका पायाने अधू जरूर होता, पण द्यूतक्रीडेत अत्यंत प्रवीण होता. त्याचे फाशांवर स्वामित्व असे होते की त्याला हवे तेच आकडे फाशांवर येत असत. एक प्रकारे त्याने फाशांवर अशी सिद्धी मिळवली होती की त्याच्या बोटे फिरवण्यावर आकडे निश्चित होत असत.
खेळाच्या सुरुवातीला पांडवांचा उत्साह वाढवण्यासाठी शकुनीने दुर्योधनाला सुरुवातीचे काही डाव युधिष्ठिराला जिंकू देण्यास सांगितले जेणेकरून पांडवांच्या मनात खेळासाठी उत्साह निर्माण होईल. आणि मग हळूहळू खेळाच्या उत्साहात युधिष्ठीर आपली सारी दौलत आणि साम्राज्य जुगारात हरला.
शेवटी शकुनीने सर्व काही एका अटीवर परत करण्याचे वचन दिले की त्याने आपले बाकी पांडव भाऊ आणि आपली पत्नी द्रौपदी हिला डावावर लावावे. नाईलाजाने युधिष्ठिराने शकुनीचे ऐकले आणि शेवटी तो हाही डाव हरला. या खेळातील पांडव आणि द्रौपदीचा झालेला अपमान हेच कुरुक्षेत्राच्या युद्धाचे सर्वांत मोठे कारण ठरले.
कुरुक्षेत्राच्या युद्धात शकुनीने दुर्योधनाची साथ दिली होती. शकुनीचा जेवढा राग कौरवांवर होता तेवढाच पांडवांवर देखील होता, कारण त्याला दोन्ही पक्षांकडून दुःख मिळाले होते. पांडवांना शकुनीने खूप त्रास दिला. भीमाला त्याने अनेक वेळा त्रस्त केले. महाभारत युद्धात सहदेवाने शकुनीचा त्याच्या पुत्रासहित वध केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel