मिस्र चे पिरामिड तिथल्या तत्कालीन फैरो (सम्राट) गणांसाठी बनवण्यात आलेली स्मारके आहेत, ज्यामध्ये सम्राटांचे शव दफन करून सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या शवांना ममी म्हटले जाते. त्यांच्या शवांसोबत खाद्यपदार्थ, पेय पदार्थ, वस्त्र, दागिने, भांडी, वाद्य, यंत्र, हत्यारे, जनावरे आणि कधी कधी तर सेवक आणि सेविकांना देखील दफन करण्यात येत असे.
भारताप्रमाणेच मिस्र ची संस्कृती खूप प्राचीन आहे आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष तिथली गौरव गाथा सांगतात. खरे म्हणजे मिस्र मध्ये १३८ पिरामिड आहेत आणि काहिरा उपनगरात तीन परंतु सामान्य विश्वासाच्या विरुद्ध केवळ गिजाचा 'ग्रेट पिरामिड'च प्राचीन विश्वाच्या सात आश्चर्यांच्या सुचीत आहे. जगातील सात प्राचीन आश्चर्यांपैकी केवळ हेच एकमात्र असे स्मारक आहे ज्याला काळाचा प्रवाह देखील संपवू शकलेला नाही. गिजाचा सर्वांत मोठा पिरामिड १४६ मीटर उंच होता! वरचा १० मीटरचा भाग आता कोसळला आहे. त्याचा आधार जवळपास ५४ किंवा ५५ हजार मीटरचा आहे. अनुमान आहे की इ. स. पू. ३२०० मध्ये तो बांधला गेला आहे. आणि त्या काळातील मिस्र लोकांची टेक्नोलॉजी शून्याच्या समान असूनही!