बेबिलोनचे झुलते उपवन ज्याला सेमिरामीसची झुलती बाग देखील म्हटले जाते, प्राचीन विश्वाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. हे वर्तमानातील इराकी शहर अल-हिल्लह च्या निकट स्थित होते. या उद्यानाची निर्मिती नबूचड्नेजार द्वितीय याने इ.स.पू. ६०० मध्ये केली होती. अशी वदंता आहे की राजा नबूचड्नेजार द्वितीय याने या उद्यानाची निर्मिती आपल्या पत्नीला खूष करण्यासाठी केली होती. इसवीसनाच्या २ शतके पूर्वी एका भूकंपामध्ये हे उद्यान पूर्णपणे नष्ट झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.