जातिरिति च ।। न चर्मणो न रक्तस्य मांसस्य न चास्थिनः ।।
न जातिरात्मनो जातिव्यवहार प्रकल्पिता॥
अर्थात – जात ही चामड्याची नसते, रक्त - मांसाची नसते, हाडांची नसते, आत्म्याची नसते. ती केवळ लोक व्यवस्थेसाठी अमलात आणली गेली आहे.
अनध्यापन शीलं दच सदाचार बिलंघनम् ।।
सालस च दुरन्नाहं ब्राह्मणं बाधते यमः॥
अर्थात – स्वाध्याय न केल्याने, आळसाने आणि कुधान्य खाण्याने ब्राम्हणाचे पतन होते.
एकाच कुळात (परिवारात) चारही वर्णी - ऋग्वेद (9/112/3) मध्ये वर्ण व्यवस्थेचे आदर्श स्वरूप सांगण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे - एक व्यक्ती कामगार आहे, दुसरा सदस्य चिकित्सक आहे आणि तिसरा चक्की चालवतो. अशा प्रकारे एकाच परिवारात सर्व वर्णाचे कर्म करणारे लोक असू शकतात. कर्माने वर्ण व्यवस्था या संकल्पनेला दुजोरा देताना भागवत पुराण (स्कंध ७ वा, अध्याय ११ वा, श्लोक कर. ३५७) मध्ये म्हटले आहे, ज्या वर्णाची जी लक्षणे सांगितली आहेत, जर त्यांच्यात ती लक्षणे नसतील आणि दुसऱ्या वर्णाची लक्षणे असतील तर ज्या वर्णाची लक्षणे आहेत, त्यांना त्याच वर्णाचे ठरवले गेले पाहिजे. भविष्य पुराण (४२, श्लोक ३५) मध्ये म्हटलेले आहे - जर शुद्र ब्राम्हणापेक्षा उत्तम कार्य करत असेल तर तो ब्राम्हणापेक्षा देखील श्रेष्ठ आहे.
ऋग्वेदात देखील वर्ण विभागाचा आधार कर्म हाच आहे. निश्चितच डून आणि कर्म यांचा प्रभाव इतका प्रबळ असतो की तो अगदी सहज वर्ण परिवर्तन करतो. जसे विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते, परंतु त्यांच्या कर्मांनी आणि गुणांनी त्यांना ब्राम्हण पदवी दिली. राजा युधिष्ठिराने नहुष मधून ब्राम्हणाचे गुण - यथा, दान, क्षमा, दया, शील, चरित्र इत्यादी सांगितले. त्यांच्या नुसार जर कोणी शुद्र वर्णाचा व्यक्ती या उत्कृष्ट गुणांनी संपन्न असेल तर त्याला ब्राम्हण मानले जाईल.