पहिला सौरबाह्य ग्रह १९९४ मध्ये पेन्सलवेनिया विश्वविद्यालयाचे डॉक्टर अलेक्जेन्डर वोल्सजक्जान यांनी शोधला होता. हा ग्रह एका मृत पल्सर ची परिक्रमा करत आहे. मातृ तारा एका सुपरनोव्हा विस्फोटाचा अवशेष आहे त्यामुळे त्या ग्रहावर जीवनाची कोणतीही शक्यता नाही. हा ग्रह एक जळालेला, मृत ग्रह आहे. पुढच्याच वर्षी जिनेव्हा चे दोन स्विस खगोल शास्त्रज्ञ मायकल मेयर आणि डीडीर क्वेलोज यांनी ५१ पेगासी ताऱ्याची परिक्रमा करणाऱ्या गुरूच्या आकाराच्या एका ग्रहाचा शोध लावला. त्यानंतर जणू काही सौर बाह्य ग्रहांची एक लाटच आलेली आहे. मागच्या १० वर्षांत सौर बाह्य ग्रहांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोलोरेडो विश्वविद्यालय बोल्डर चा
भूगर्भ शास्त्रज्ञ ब्रुस जैकोस्की नुसार -
" हा मानव इतिहासाचा खास काळ आहे. आपण परग्रही जीवन शोधू शकणाऱ्या पहिल्या पिढीचा हिस्सा आहोत."
यांच्यापैकी कोणतेही सौर मंडळ आपल्या सौर मालेसारखे नाही. खरे म्हणजे ही सर्व सौर मंडळे आपल्या सौर मालेपेक्षा अगदी भिन्न आहेत. एके काळी शास्त्रज्ञ असे मनात होते की आपली सौर माला ही ब्राम्हांदातील इतर सौर मालान्प्रमाणे एक सामान्य मंडळ आहे, ज्यामध्ये वर्तुळाकार मार्ग आणि तीन पट्ट्यांमध्ये ग्रह आपल्या मातृ ताऱ्याची परिक्रमा करतात. मातृ ताऱ्याच्या जवळ दगडी आतल्या बाजूचे ग्रह, मध्ये वायूचे विशालकाय ग्रह आणि शेवटी बर्फाळ धुमकेतू.
परंतु आश्चर्य कारक रित्या नवीन शोधण्यात आलेल्या सौर माला या साधारण नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सामान्यतः गुरु सारख्या वायूच्या विशाल ग्रहणी मातृ तार्यापासून दूर अंतरावरून परिक्रमा केली पाहिजे, परंतु बहुतेक सगळे आपल्या मातृ ताऱ्याच्या जवळ मिळाले आहेत. बुध ग्रहाच्या कक्षेपेक्षा देखील अधिक जवळ. किंवा काही जास्तच मोठ्या दिर्घवृत्ताच्या कक्षेत. या दोन्ही अवस्थांमध्ये गोल्डीलाक क्षेत्रात पृथ्वी सारखा ग्रह असणे असंभव आहे. जर गुरु सारखा महाकाय ग्रह मातृ ताऱ्याच्या इतक्या जवळून परिक्रमा करत असेल तर याचा अर्थ आहे की तो दूर अंतरावरून स्थानांतरीत होऊन हळू हळू एका स्पायरल प्रमाणे आपल्या सौर मंडळाच्या केंद्राच्या समीप येऊन पोचला आहे. या प्रक्रियेत हा ग्रह पृथ्वीसारख्या छोट्या ग्रहांच्या कक्षेतून प्रवास करत आलेले असणार आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने ते छोटे ग्रह दूर अंतराळात कुठेतरी भिरकावले गेले असणार. जर गुरु सारखा मोठा ग्रह दीर्घ वर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करत असेल तरी तेव्हा देखील तो गोल्डीलाक क्षेत्रातून जाईल आणि या परिस्थितीत देखील या क्षेत्रातील छोटे ग्रह दूर अंतराळात फेकले जातील.
पृथ्वी सारखा ग्रह शोधण्याचा प्रयत्न करणार्यांसाठी ही गोष्ट निराशाजनक आहे परंतु मिळालेली माहिती ही अनपेक्षित देखील नव्हती. आपल्याकडची उपकरणे ही अजून पर्यंत गुरु सारख्या महाकाय आणि अति वेगवान ग्रहांचा मातृ तऱ्यावरचा प्रभावाच मोजू शकतात. त्यामुळे यात कोणतेही आश्चर्य नाही की आपल्या दुर्बिणी अति वेगाने फिरणाऱ्या आणि महाकाय आकाराच्या ग्रहांना शोधू शकल्या आहेत. जर अंतराळात आपल्या सारखी हुबेहूब सौर माला असलीच तरी आपली उपकरणे त्यांना शोधू शकणार नाहीत.