सन १९५० मध्ये खगोल शास्त्रज्ञांनी मंगळ गेःवर एक मोठा "M" पाहिल्यानंतर मंगळ ग्रह आणि मंगळ निवासी लोकांबद्दल च्या बातम्यांनी मोठी उचल खाल्ली होती. काही लोकांसाठी हा प्रकार म्हणजे मंगळ निवासींचा पृथ्वी वासियांसाठी संदेश होता ज्याच्यात "M" इंग्रजीच्या "MARS" चे पहिले अक्षर होते आणि ज्याप्रकारे खेळाच्या मैदानात चीयर लीडर्स आपल्या संघाचे आद्याक्षर बनवतात, त्याच प्रकारे मंगळ निवासी हे अक्षर तयार करून पृथ्वीला संदेश देत आहेत. निराशाजनक विचार करणाऱ्या लोकांसाठी हा "MARS" मधील "M" नसून "WAR" मधला "W" होता, जो मंगळ निवासींची पृथ्वी विरुद्ध युद्धाची घोषणा होती. काही दिवसांनी मंगल ग्रहावरचा हा जो काही "M" किंवा "W" होता तो अपोआप मिटून गेला. एक ठळक शक्यता अशी आहे की मंगळ ग्रहावर आलेल्या एखाद्या विशाल धुळीच्या वादळामुळे ही आकृती बनली होती. या वादळाने संपूर्ण मंगळ ग्रह झाकून टाकला होता, परंतु तिथली चार ज्वालामुखी ची शिखरे हे वादळ व्यापू शकले नव्हते, आणि धुळीत ही चार शिखरे "M" ही आकृती बनवत होती.