एच. आय. व्ही. संसर्गाचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे रक्त आणि रक्त दानामार्गे आहे. रक्ताद्वारे संसर्ग नशेची औषधे घेताना सुया टोचताना, संसर्ग झालेल्या सुईने जखम होणे, दुषित रक्त किंवा रक्त दानाच्या माध्यमातून किंवा त्या सुयांच्या माध्यमातून ज्या एच. आय. व्ही. संक्रमित उपकरणांच्या सोबत असतात. औषधाची इंजेक्शन्स वाटून घेतल्यामुळे याचा संसर्ग होण्याची शक्यता ०.६३ - २.४% असते, याचे सरासरी प्रमाण ०.८ % आहे. एच. आय. व्ही. बाधित व्यक्तीने वापरलेली सुई वापरल्याने याचा संसर्ग होण्याची शक्यता ०.३% असते (३३३ मध्ये १). आणि श्लेष्मा झिल्ली च्या रक्तापासून संसर्ग होण्याची शक्यता ०.०९% (१००० मध्ये १) इतकी असते. अमेरिकेच्या संयुक्त राज्यांमध्ये २००९ मध्ये १२% प्रकरणे अशा लोकांची आहेत जे आपल्या नसांमध्ये नशेची औषधे टोचून घेत.(३३) आणि काही क्षेत्रात नशिल्या पदार्थांचे सेवन करणाऱ्यातील ८०% पेक्षा अधिक लोक एच. आय. व्ही. बाधित आढळले आहेत. एच. आय. व्ही. संक्रमित रक्ताचा प्रयोग केल्याने संसर्गाचा धोका ९३% पर्यंत असतो. विकसित देशांमध्ये संक्रमित रक्ताद्वारे एच. आय. व्ही. पसरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे (५,००,००० मध्ये १ पेक्षाही कमी). कारण तिथे रक्त देणाऱ्या व्यक्तीची एच. आय. व्ही. चाचणी त्याचे रक्त घेण्याआधी केली जाते. ब्रिटन मध्ये तर हे प्रमाण ५० लाखांमध्ये १ यापेक्षाही कमी आहे. तर अविकसित देशांमध्ये रक्ताचा उपयोग करण्यापूर्वी केवळ अर्ध्या रक्ताचीच योग्य प्रकारे चाचणी केली जाते (२००८ च्या अहवालानुसार). असे अनुमान आहे की या क्षेत्रांमध्ये १५% एच. आय. व्ही. चा संसर्ग हा रक्त किंवा रक्तदानाच्या माध्यमातून होते. हे प्रमाण विश्वातील संसर्गाच्या ५ - १०% इतके आहे. उप सहारा आफ्रिका इथे एच. आय. व्ही. च्या प्रसारात असुरक्षित वैद्यकीय तपासणी सुया महत्त्वाची भूमिका निभावतात. २००७ मध्ये या भागात संसर्गाचे कारण (१२ - १७%) हे असुरक्षित सुया हेच होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुमानानुसार असुरक्षित वैद्यकीय सुयांद्वारे एच. आय. व्ही. संसर्ग होण्याचा धोका आफ्रिकेमध्ये १.२% प्रकरणांमध्ये असतो. टेटू काढणे किंवा काढून घेणे, खाजवणे यांपासूनही संसर्गाचा धोका कायम राहतो, परंतु अजूनपर्यंत असे एकही प्रकरण घडल्याचा पुरावा नाही. डास किंवा इतर किडे कधीही एच. आय. व्ही. चा प्रसार करू शकत नाहीत.