पाण्याने दिवे लागतात
कालीसिंधी नदीच्या तीरावर असलेल्या देवीच्या या मंदिरात होणारा चमत्कार बघुन कोणत्याही माणसाचे मस्तक श्रद्धेने झुकेल. या मंदिरात दिवा किंवा समई प्रज्वलित करण्यासाठी त्यामध्ये तेल किंवा तूप घालण्याची आवश्यकता लागत नाही, कारण ते चक्क पाण्याने पेटतात. या मंदिरातील या चमत्काराचा साक्षात्कार घेण्यासाठी दूर-दूरवरून लोक इथे येतात.
'गडियाघाट वाली माताजी' या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर कालिसिंधी नदीच्या किनारी नलखेडा गावापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गडिया या गावाजवळ आहे. मंदिरात पूजा - अर्चा करणारे पुजारी सिद्धुसिंह यांच्या सांगण्याप्रमाणे पूर्वी देवीमातेच्या दरबारात तेलाचे दिवे जळत असत. परंतु आजपासून साधारण ५ वर्षांपूर्वी देवीमातेने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन पाण्याचे दिवे लावण्यास सांगितले. सकाळी उठून त्यांनी जेव्हा पाण्याचा दिवा लावून पहिला, तेव्हा तो खरंच पेटला. तेव्हापासून ते आजतागायत इथे कलीसिंधी नदीच्या पाण्यापासूनच दिवे लावले जातात.
देवीमातेच्या याच चमत्काराचा साक्षात्कार घेण्यासाठी आज दूर दूरवरून लोक इथे येतात आणि देवीमातेच्या चरणाशी लीन होतात.