१९५०च्या दशकात एक अजब किस्सा घडला. एक असा चित्रपट आला ज्यामध्ये एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला आक्षेपार्ह गोष्टी करताना दाखवले होते. याविरोधात सरकारने कठोर पावले उचलत १६ आठवड्यात चित्रपटावर बंदी आणली. या चित्रपटाचं नाव होतं 'संग्राम' आणि नायक होते अशोक कुमार. ५० च्या दशकात काही अद्वितीय चित्रपट आले. सुरुवात केली राज कपूरच्या "आवारा"ने, ज्यातील नार्गिसच्या 'बाथ सूट सीन' ने त्याकाळी खूप खळबळ माजवली होती. चित्रपट रूस मध्ये (रशिया) खूप लोकप्रिय ठरला. आजही तिथे स्थानिक ओपेरामध्ये त्यातील गाणी वाजवली जातात. त्यावेळेस भारतीय चित्रपट जगतात अमुलाग्र बदल घडून आला. बिमल रॉय, राज कपूर, मेहबूब खान, गुरुदत्त, बी.आर.चोपडा, के.आसिफ, रमेश सेहगल, विजय आनंद, व्ही.शांताराम इत्यादी निर्मात्यांच्या चित्रपटांतून लोकांच्या खाजगी आयुष्याची झलक दिसू लागली. त्याबरोबरच सत्यजित रे यांनी "कला" नावाचा एक निराळ्या धाटणीचा सिनेमा बनवला, जो चित्रपट जगताच्या इतिहासात सोनेरी पान बनला. १९५० ते १९६० च्या दरम्याने तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि "कृष्ण-धवल" ऐवजी रंगीत चित्रपट बनू लागले.
दाक्षिणात्य चित्रपट व्यवसाय आणि राजकारण यांचे संबंध कायम राहिले. शिवाजी गणेशन "पराशक्ती" नावाच्या चित्रपटाचे नायक झाले आणि कोर्टरूमच्या ५ मिनिटांच्या दृश्यात त्यांनी सर्वांची मने जिंकली. संवाद त्यावेळचे तामिळनाडूचे मुखमंत्री के.करुणानिधी यांनी लिहिले होते. सन १९५२ मध्ये मुंबई येथे इफ्फी ची स्थापना झाली. "दो बिघा जमीन" या बिमल रॉय आणि बलराज साहनी यांच्या चित्रपटाने जगभरात अनेक पुरस्कार मिळवले आणि जगाने भारतीय चित्रपटांकडे गंभीरतेने पाहायला सुरुवात केली. १९५३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुरु झाले आणि पाहिला राष्ट्रीय पुरस्कार "श्यामची आई" या मराठी चित्रपटाला मिळाला.
भारताचा पाहिला टेक्नीकलर सिनेमा "झांसी की रानी" याच वर्षी प्रदर्शित झाला, ज्यामध्ये दिग्दर्शक सोहराब मोदींच्या पत्नी महताब यांनी काम केले. याच सुमारास "आदी शंकराचार्य" हा पाहिला संस्कृत चित्रपट प्रदर्शित झाला. १९५५ एक उत्तम वर्ष होते. याच वर्षी सत्यजित रे यांचे अपु ट्रायलॉजी, पथेर पांचाली प्रदर्शित झाले ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सन १९५७ मध्ये काही नवीन अविष्कार असलेले अप्रतिम चित्रपट बनले, ज्यामध्ये एक जर्मन चित्रपटावर आधारित असलेला व्ही.शांताराम यांचा "दो आंखे बाराह हाथ" हा होता. पथेर पांचालीला सन फ्रान्सिस्को मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. मदर इंडियाला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले, परंतु प्रत्यक्षात पुरस्कार मिळाला नाही.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या "कागज के फूल"ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात तंत्रज्ञानाबरोबरच गुरुदत्तच्या सुरेख अदा लोकांना पाहायला मिळाल्या. स्वप्नसुंदरी मधुबालाने 'बाबूजी समझो इशारे' गाण्यातून लाखोंची मने जिंकली. अनुप, अशोक आणि किशोर या कुमार बंधुंबरोबारचा तिचा "चलती का नाम गाडी" खूपच लोकप्रिय ठरला.
१९६० मध्ये अनेक चित्रपट आले. पण त्यापैकी एकाने इतिहास घडवला. त्याकाळी १.५ कोटींची गुंतवणूक असलेल्या या सिनेमाचे शूट पूर्ण व्हायला तब्बल १५ वर्षे ५०० दिवस लागले!! चित्रपट होता "मुघल-ए-आजम"... हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आणि सन २००६ मध्ये त्याची रंगीत आवृत्ती देखील प्रदर्शित झाली!
१९६३ मध्ये कुतुबमिनारच्या पायऱ्यांवर विहारात देव आनंद आणि नुतन ने 'दिल का भवर करे पुकार' म्हणत प्रेमाच्या संकल्पनेला एक वेगळी खुमारी दिली. या वर्षी एस.डी.बर्मन यांची अनेक गाणी गाजली. "तेरे घरके सामने" मुळे देव आनंद तरुणींचा लाडका नायक बनला. १९६५ मध्ये देश चीन युद्ध आणि नेहरूंच्या मृत्यूमुळे त्रस्त होता. यासुमारास चित्रपट जगतातही एक बदल घडत होता. चित्रपटातील गरीब शेतकरी आणि त्यांच्या व्यथांची जागा उच्च्वार्गीयांच्या पार्ट्या, आलिशान बंगले आणि महागड्या गाड्यांनी घेतली. यश चोपडानी वक़्त से खूबसूरत ची निर्मिती केली. १९६६ मध्ये दुष्काळामुळे भारत इतका मोडकळीला आला की परदेशातून मदत घ्यावी लागली. त्यामुळे रुपयाचे मूल्य घसरले. याच वर्षी रिता फरिया पहिली भारतीय मिस वर्ल्ड झाली. याच वर्षी शर्मिला टगोरनेही आपल्या फिल्मी करियरचा श्रीगणेशा केला.
१९७६ मध्ये मनोज कुमारच्या "उपकार"ने लोकांचा स्वदेशावरचा उडालेला विश्वास काही प्रमाणात परत मिळवून दिला. जेव्हा जगाच्या दृष्टीने भारतीय लोकशाही कारभार बिघडत चालला होता, या चित्रपटाने लोकांवर प्रभाव पाडला. खलनायक प्राण पहिल्यांदाच एक अपंग सैनिक 'मंगल बाबा'च्या व्यक्तिरेखेत दिसले.
१९६८ मध्ये एस.डी.बर्मनच्या चिरंजीवांनी चित्रपट जगतावर राज्य करायला सुरुवात करतानाच "मेरे सामनेवली खिडकीमे" हे लोकप्रिय गाणं दिलं. या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. मेहमूदच्या अदाकारीने सर्वांची मने जिंकली. याच सुमारास "खामोशी" सिनेमा आला, ज्यात वहिदा रेहमान हि मानसिक रुग्ण असलेल्या राजेश खन्नावर इलाज करताना त्याच्या प्रेमात पडते. परंतु राजेश खन्ना बारा होऊन निघून जातो आणि या गोष्टीचा वाहिदाला मानसिक धक्का बसतो.असित सेन द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाच नाव होत खामोशी