टी. व्ही. होस्ट जॉन वॉल्शन च्या सहा वर्षांच्या मुलाची १९८१ मध्ये हत्या झाली.  एडम वाल्श १९८१ मध्ये कॅलिफोर्नियाच्या एका मॉलमधून गायब झाला होता. त्याच वर्षी मासे पकडणाऱ्या कोळ्यांना त्याचं डोकं एका कालव्यात सापडलं. त्याच्या बाकी शरिराबद्दल काहीच माहिती नव्हती.  पोलिसांना बरीच वर्ष ओत्तील टूलवर संशय होता, ज्याने दोन वेळा गुन्हा कबुल केला आणि मुलाला मारण्याची गोष्ट सांगितली. पण त्याने अनेक लोकांना मारल्याचं सांगितलं असल्याने पोलिसांनी त्याच्या प्रत्येक साक्षीला खोटं ठरवलं. पण शेवटी टूलच्या पुतणीने सांगितलं की मरण्याआधी तिच्या काकांनी जेलमध्ये एडम वाल्श च्या खुनाचा आरोप मान्य केला होता. पोलिसांनी २००८ मध्ये केस बंद केली. एडम च्या मृत्यूने प्रेरित होऊन त्याच्या वडिलांनी लोकप्रिय टी. व्ही. मालिकाअमेरिकाज मोस्ट वॉंटेडसुरू केली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel