राजेश, रिया, सोनिया आणि आकांक्षा आणि साधू बाबा जिन्याच्या पायऱ्या उतरत होते.

“सुभानराव आले नाहीत का?” राजेशने विचारले.

“आपण त्यांना लवकरच भेटू” साधूबाबांनी टॉर्च चालू केला.

लाईट भिंतीवर पडताच समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, जिन्याच्या भिंतींवर भितीदायक चित्रे काढली होती. ते खाली उतरत असताना चित्रे जिवंत झाली होती आणि भयानक आवाज काढून घाबरवत होती.

"त्यांच्याकडे लक्ष देऊ नका..." कमंडलुतून पाणी शिंपडत साधूबाबा म्हणाले.

ते खाली पोहोचताच रियाला वाटले की कोणीतरी तिचे पाय खाजवत आहे, तिने खाली पाहिले तर  एक काळी सावली दिसेनाशी झाली. रियाने धावत जाऊन राजेशचा दंड पकडला आणि डोळे घट्ट मिटले.

चालत चालत ते एका खंदकात पोहोचले आणि तिथे सुभानरावांनी दोरी वरून खाली सोडली,  सुभानरावांना तिकडे वरती बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. सुभानरावांच्या मदतीने ते बाहेर आले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आजूबाजूला हिरवळ, झाडे आणि सूर्यप्रकाशामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला.

"ते कुठे आहेत?" आकांक्षाने कावऱ्या बावऱ्या नजरेने आजूबाजूला बघितले.

"मॅडम, आपल्याला आधी इथून निघायला हवं. सर भेटतील..चला..” सुभानराव म्हणाले.

काही पावले पुढे चालताच रियाने सोनियाला आश्चर्याने विचारले, "टफी कुठे आहे?"

ते सर्व आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले आणि विचारले, "टफी कुठे आहे?"

साधूबाबा म्हणाले, “टफी? कोण टफी?”

तेव्हा त्यांनी टफी म्हणजे आपला पाळीव कुत्रा असल्याचे सांगितल्यावर साधूबाबा हसत म्हणाले.

"काळजी करू नका, तो आमच्या सोबत आहे." सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तेवढ्यात एक कार त्यांच्या जवळ येऊन थांबली. त्यात कांता होती आणि काही पोलीस होते, एक माणूस होता.

कांता गाडीतून खाली उतरली आणि त्या सर्वांना पाहून खूश झाली. सोनिया आणि ते तिघेही कांताकडे आश्चर्याने बघितले आणि विचारले

 “कांता? तू इथे कशी काय?

मग एक माणूस गाडीतून खाली उतरला आणि त्याने त्याची गोल काळी टोपी काढली. त्याला पाहून मग आकांक्षाला धक्काच बसला.

ती पळत गेली आणि जाऊन त्याला मिठी मारली आणि रडत म्हणाली. "कौस्तुभ, कौस्तुभ"

सोनिया आकांक्षा आणि कौस्तुभकडे बघत म्हणाली, "दादा." आणि ती कौस्तुभला मिठी मारून रडू लागली.

सोनियांचे अश्रू पुसत कौस्तुभ म्हणाला " सोनू, माझी लाडकी बहीण."

राजेश आणि रियानेही त्याला मिठी मारली आणि त्याचे स्वागत केले.

" आई मी बाबांच्या शोधात इकडे आलो आणि आदिवासी लोकांनी मला कैद केले होते. खूप टॉर्चर करून मला त्यांनी समुद्रात फेकून दिले. तिथून मी श्रीलंकेत पोहोचलो. परत येताना मला बरेच सरकारी सोपस्कार पार पडावे लागले आणि मग मी भारतात परत आलो. तर कांता ताई म्हणाली की तुम्ही तर इथे आल्या आहात त्यामुळे मला भीती वाटली पण शेवटी देवानेच मार्ग दाखवला आणि सगळे नीट झाले."

इतक्यात सर आले आणि म्हणाले, "चला, इथे धोका आहे"

आकांक्षाने त्यांच्याकडे बघताच तिचे डोळे आनंदाने पाणावले. आकांक्षाने क्षणार्धात त्यांना ओळखले. आणि थरथरत्या हातांनी बोटाने दाखवत म्हणाली "हा कौस्तुभ आणि हि सोनिया आणि हा राजेश” 

सरांना कौस्तुभ आणि  सोनिया यांनी मिठी मारली "बाबा..." ते गोंधळले..

आकांक्षा रियाला मिठी मारून रडू लागली.  सुभानराव आश्चर्यचकित होऊन हसत म्हणाले.

" पहिल्यांदाच हे घडत आहे कोणी या भूत्याच्या वाड्यातून जिवंत घरी जात आहे. डॉक्टर आशिष पेडणेकर तुम्ही नशीबवान आहात "

"मी डॉ. आशिष पेडणेकर आहे का?” आशिषने गोंधळून बघत विचारले.

"हो आणि मी तुमची लग्नाची बायको आहे." आकांक्षा रडत आणि खिन्न होत म्हणाली.

“हे बघा, तुम्ही सगळे लवकर गाडीत बसा,  इथले आदिवासी खूप धोकादायक आहेत.कधीही हल्ला करू शकतात” सुभानराव म्हणाले.

लगेच ते सर्वजण गाडीत बसले. पण डॉक्टर पेडणेकर अजूनही गोंधळले होते.

सुभानराव त्यांना म्हणाले, "सर तुमचाच परिवार आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर निश्चिंतपणे जाऊ शकता."

मग डॉक्टर आशिष पेडणेकर गाडीत बसले आणि टफीला आपल्या मांडीवर घेऊन म्हणाले

"मला माझे स्वतःचे कुटुंब असावे अशी खूप इच्छा होती, कदाचित तुमच्याबरोबर राहून मला काहीतरी आठवेल."

मग सर्वांनी साधूबाबांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले

"तुम्ही सर्वजण सुखी राहा. देव  तुमचे भले करेल"

गाडी पुढे जाऊ लागली. झाडे मागे धावू लागली आणि सोनियाने गाडीच्या मागच्या काचेतून भूत्याचा वाडा पाहिला आणि तिच्या मनात विचार आला की ती पुन्हा इथे येईल या अतृप्त शक्तींना मुक्ती मिळवून देईल. आणि त्या आदिवासींच्या अत्याचाराचा अंत करेल.

आणि बघता बघता त्यांची गाडी सुभानरावाच्या नाजेरच्या आड गेली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel