रात्री साधारण १ वाजता आकांक्षा आणि टफी झोपी गेले, काम करत करत सोनियालाही झोप लागली.

सकाळच्या पहिल्या किरणाबरोबर टफी उठला आणि थेट किचनमध्ये गेला, आकांक्षाने टफीसमोर त्याच्या बाउलमध्ये डॉग फूड काढले आणि ग्रीन टी घेऊन सोनियांच्या खोलीत गेली. सोनिया तिच्या खोलीत नव्हती. आकांक्षाने खिडकीतून बाहेर पाहिलं तर सोनिया गार्डन बेंचवर बसून तिची फाईल वाचत होती.

आकांक्षा ग्रीन टी घेऊन सोनियाकडे गेली. ग्रीन टी दिला आणि विचारले

"तुझं प्रोजेक्ट अजून संपलं नाही का?"

“नाही, हे प्रोजेक्ट नाही, ही बाबांची फाईल आहे, यात त्या वाड्याबद्दल सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत,” सोनिया फाईलची पाने उलटत म्हणाली.

“सोनिया, मला माझा भूतकाळ विसरायचा आहे, तू तो नेहमी माझ्यासमोर आरशाप्रमाणे ठेव. तू असं का करतेस?, तुला काय मिळतं असं करून? त्यांना जाऊन तीस वर्षं झाली पण तू अजूनही त्या वाड्याला धरून आहेस" आकांक्षा रडत म्हणाली.

“आई, मी लहानपणी शाळेत जायचे तेव्हा सगळ्या मुली त्यांच्या वडिलांसोबत शाळेत यायच्या. जेव्हा त्या त्यांना बाय करायच्या तेव्हा त्या मला एकच प्रश्न विचारायच्या की माझे बाबा कुठे आहेत? मला हि गोष्ट मला जगू देत नाहीये की बाबांची आणि दादाची डेड बॉडी मिळाली नाही, तर त्यांना मृत कसे घोषित केले? तुझ्या नवऱ्याचे आणि मुलाचे काय झाले असेल? तुला जाणून घ्यायचे नाही का ते?”

आकांक्षाच्या खांद्यावर डोकं ठेवत सोनियाने पुढे विचारलं

"आई, प्लीज, मला फक्त एकदा तिथे जायचंय, मला तिकडे नक्की काय आहे ते पहायचंय. ते  दोघे कधीच परत का आले नाहीत?  मला त्या वाड्याची सर्व रहस्य उलगडून पहायची आहेत, बाबांनी लिहिलंय की त्या वाड्यात ५०  भुते होती. पण त्यांना कोणीच पाहिले नाही, मग त्यांनी ती कशी मोजली?”

सोनिया आकांक्षाकडे पाहून म्हणाली.

“मला एवढंच माहीत आहे की तू तुझ्या लग्नाचा विचार कर, तू मोठी होत आहेस. आणि राजेश किती दिवस थांबणार?

आकांक्षाने सोनियाचा हात हातात घेतला आणि म्हणाली. तेवढ्यात टफी धावत आला आणि सोनियांचा गाऊन ओढू लागला.

“अरे, गप्पांच्या ओघात आपल्याला  बेल ऐकूच आली नाही.....” 

आकांक्षाने अंदाज घेतला आणि जाऊन गेट उघडले. समोर रिया, राजेश आणि कांता उभे होते.

रिया म्हणजे राजेशची बहीण आणि सोनियाची मैत्रिण आहे. रियाच्या थ्रू सोनिया राजेशला भेटली आणि त्याची जीवनसाथी म्हणून निवड केली होती. पण वडील आणि भावाच्या मृत्यूमागील गूढ उकलता यावे म्हणून सोनियाने राजेशकडे काही वेळ मागितला होता. राजेश तसा खूप छान आणि दयाळू माणूस आहे. त्याने सोनियाला सांगितले की त्याने सोनियाच्या नावावर आपले आयुष्य केले आहे. काही झाले तरी आता तो सोनिया सोबतच लग्न करणार आहे.आणि कांता ही आकांक्षाची मोलकरीण आहे जी घरकाम करून रात्री तिच्या घरी जाते.

“अरे राजेश तू, ये ये!”

आकांक्षाच्या हृदयाचे ठोके वाढले होते, राजेश आता लग्नासाठी आणखी थांबू शकणार नाही असे तिला वाटले.

“काकू, सोनिया कुठे आहे?” रियाने सोफ्यावरचे कुशन हाताने सारखे करत विचारले?

“मॅडम काय? नेहमीप्रमाणे भूतावर संशोधन करत बसल्यात.”

कांताने तिची छत्री गेटच्या हुकावर लटकवली आणि ती तिच्या कामाला लागली.

“कांता, तू साफसफाई नंतर कर, आधी जरा नाश्ता आणि कॉफीची व्यवस्था कर.” आकांक्षाने तिला ऑर्डर दिली.

“रिया आणि राजेश तुम्ही या, सोनिया गार्डनमध्ये बसली आहे. तिथेच चला, टफी देखील तिथेच खेळेल.”

आकांक्षा मेनडोर लावून घेत म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel