"राजेश दादाssss, कुठे आहेस?" रडत रडत रिया म्हणाली.

मग अचानक सोनियाच्या मनात आले की तो कपाटातला हात राजेशचा तर नसेल, काही न बोलता सोनियाने ज्या खोलीत हात दिसला त्या खोलीकडे वेगाने धाव घेतली. तिने पळत जाऊन त्या खोलीचे कपाट पहिले आणि तिला धक्काच बसला. तिला तो हात तिकडे दिसला नाही.


“सोनियाsss, सोनियाss”  तिला आईचा आवाज ऐकू आला. ती घाबरली तिला घाम फुटला होता.

"ओह शीट, तो हात आता इथेच होता, गेला कुठे?" सोनिया स्वतःशीच पुटपुटली.

ती इकडे तिकडे बघत बघत बाहेर पळत गेली पण तोपर्यंत रिया आणि आई गायब झाल्या होत्या. तिची तंतरली होती. ती हळू हळू सगळीकडे नजर फिरवत फिरवत दबकत दबकत हाका मारू लागली. तिचा श्वास घुसमटत होता.

“आईsss, टफीsss, राजेशsss, रियाss,”

"कुठे गेले असतील सगळे?" तीने स्वतःलाच प्रश्न केला आणि आजूबाजूला पहिले. भल्यामोठ्या प्रशस्त खोल्या आणि पायऱ्या! आणि समोर बंद गेट, अजस्त्र झुंबर आणि भिंतीवर सिंहाचे मोठे तोंड! एकटे पडणे फारच विचित्र परिस्थिती असते. त्यात कमी उजेड त्यामुळे मनामध्ये घर करून बसलेला अंधार आणखी आणखी गडद होत जातो. क्षणभर वाटून जाते कि आता सगळे काही संपले आहे.

"नाही, असे घाबरून चालणार नाही, मला माझ्या वडिलांना आणि भावाला शोधून काढायचे आहे."

सोनियाने स्वतःला खोटा खोटा दिलासा दिला. घाबरत घाबरत तिने हातांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला.


“आई तू कुठे आहेस ? “ असे म्हणत म्हणत तिने कोयंडा उघडायचा प्रयत्न केला आणि कडीच्या 'कुईs कुsईs कुईs अशा भयंकर आवाजाने शांतता भंग झाली. सोनियाच्या हृदयात जोरात धडधड होत होती.

तिने दार उघडले आणि ती आत गेली, तिचे हात थरथर कापत होते. त्याच थरथरत्या हातांनी तिने खिडकीचे पडदे सरकवले. धुळीने तिला लागोपाठ दोन चार शिंका आल्या.

जरा सेटल झाल्यावर तिने  खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात तिला तिच्या पायाला कसलातरी स्पर्श जाणवला. तिने डोळे मिटून घेतले होते आणि दोन्ही हातानी जोर लावून खिडकी उघडली.

खिडकी उघडताच खोली उजेडाने भरून गेली. सोनियाने घाबरून डोळे उघडले आणि तिच्या डोळ्याला तो प्रकाश सहन झाला नाही. तिने डोळे किलकिले करून खिडकीबाहेर पहायचा प्रयत्न केला तिला समोर बाग दिसली. तिला खूप विचित्र वाटले.

खोलीत एक ऑर्गनची पायपेटी होती. काही चित्रे भिंतीवर टांगलेली होती आणि एक तुटलेली लाकडी संदूक होती. खिडकीला लोखंडी ग्रील होते त्याचे गज सोनियाने हाताने धरले होते,  इतक्यात सोनिया कळवळली. तिचा हात कोणीतरी जोराने चावला होता, तिने बोटाकडे पाहिले तर बोट चांगलेच सुजले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel