वास्तुपुरुषाला वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे. वास्तुपुरुषाविषयी एक पौराणिक काळातील कथा ऐकायला मिळते.

स्वर्गात एकदा एक महाकाय शरीराचा पुरुष जन्माला आला. तो जन्मत:च अवाढव्य शरीराचा होता. आणि पुढे दिवसेंदिवस त्याच्या शरीराची अजस्त्र वाढ होऊ लागली.

स्वर्गातील सर्व देवलोक त्याचे महाकाय रूप पाहून घाबरून गेले. त्यांनी ब्रह्मा, भगवान विष्णू व भगवान शंकराला हा विषय अवगत करून दिला. ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते, भगवान विष्णू  सृष्टीचे पालक तर भगवान शंकर हे संकट निवारक सृष्टीचे संरक्षक, संहारकर्ते आहेत.

या तिघांनी विचारविनिमय केला आणि त्या महाकाय पुरुषाला एका खोल खड्ड्यात जमिनीत गाडण्याची कल्पना सांगितली. त्याप्रमाणे एका मोठ्या खड्ड्यात तो पुरुष देवांनी गाडला.

या पुरुषाला ‘वास्तुपुरुष’ हे नाव प्रचलित झाले.

वास्तुपुरुषाचे शिर ईशान्य दिशेला होते. उजवी बाजू व हात वायव्य दिशेला होते. याप्रमाणे प्रत्येक दिशेला शरीर अवयव होते. वास्तुपुरुषाच्या स्थितीवरून पुढे वास्तुशास्त्रीय आकार रचना अस्तित्वात आली.

ही झाली पौराणिक कथा. यावरून आपण प्रचीती अशी घेऊ शकतो की या वास्तुपुरुषाला जमिनीत गाडून संपूर्ण वास्तूचा भार त्याच्या अंगाखांद्यावरच आपण टाकतो. म्हणून वास्तू निर्माण करताना सुरुवात वास्तुपुरुषाच्या पूजनाने केली जाते.

पुराणातल्या गोष्टी जर पुराणात असे मानले तरी हे आढळून येईल की, वास्तुशास्त्रातील नियमांना वैज्ञानिक आधार आहे.

सूर्याची वैश्विक ऊर्जा पूर्वेकडून पृथ्वीकडे अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या स्वरूपात येते. ही किरणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. पृथ्वीची चुंबकीय शक्ती उत्त्तरेतून दक्षिणेकडे वाहते.

जेव्हा पृथ्वीचा पूर्व गोलार्ध तापतो तेव्हा पश्चिम गोलार्ध थंड असतो. नेहमी उष्णतेचे वहन उष्ण भागाकडून थंड भागाकडे होते. सूर्यकिरणांपासून उत्पन्न झालेली विद्युतशक्ती पूर्वेकडून पश्चिमेकडे संचारित होते त्यामुळे पृथ्वीत चुंबकीय गुणधर्म निर्माण होतो. याचाच परिणाम असं कि उत्तर आणि दक्षिण हे दोन ध्रुव निर्माण होतात.

प्राणवायू ईशान्य दिशेतून वाहतो तर कार्बनडाय ऑक्साइड हा वायू नैऋत्य दिशेतून वाहतो. सूर्याच्या किरणांची प्रखरता इन्फ्रारेड किरणांत आढळते.

वास्तुपुरुष रचनेत दिशांचे असे साधर्म्य आपणास  दिसते. दिशांचे योग्य संतुलन जर वास्तूत आपण राखले तर योग्य परिणाम मिळतात आणि जर का हेच संतुलन बिघडले, तर वास्तुदोष उत्पन्न होतात आणि याचे अशुभ परिणाम जाणवतात.

 

वास्तुपुरुष मंत्र

नमस्ते वास्तुपुरुष भूशैय्याभिस्त प्रभो।

मदग्रहे धन धान्यादि समृद्धि कुरु सर्वदा॥

रोज सकाळी आंघोळ करून वास्तुपुरुषाला वंदन करावे आणि हा मंत्र १०८  वेळा म्हणावा. हा मंत्र म्हणून आपण वास्तुपुरुषाचे आभार मानतो कारण वास्तुपुरुषाने त्याच्या समर्थ भुजांवर आपल्या वास्तूचा भार पेललेला असतो. त्यामुळे त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करावे.

धनधान्य, सौख्य, समृद्धी, आरोग्य, मन:शांती, यश, लौकिक मिळावे यासाठी वास्तुपुरुषाची प्रार्थना आवश्यक असतेच.पण  मंत्राचे योग्य उच्चारण व श्रद्धापूर्वक उपासना केली तर फार मोठे फळ प्राप्त होते.

मंत्रामुळे मन:शांती मिळते आणि  विपुल आत्मबळ मिळते. मनोबल मिळाल्याने मन उत्साहित होते, आणि नेहमी सकारात्मक विचार येतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel