ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
राशी स्वरूप - कन्या, राशी स्वामी - बुध.
१. राशीचक्रातील सहावी रास. दक्षिण दिशेची द्योतक. राशीचे चिन्ह आहे हातात फुप घेतलेली कन्या. राशीचा स्वामी बुध आहे. हिच्या अंतर्गत उत्तराफाल्गुनी नक्षत्राचे दुसरे, तिसरे आणि चौथे चरण, चित्रा चे पहिले दोन चरण, आणि हस्त नक्षत्राचे चारही चरण येतात.
२. हे लोक खूप जास्त महत्त्वाकांक्षी असतात. भावनाप्रधान असतात आणि बुद्धीपेक्षा मनाने जास्त कामे करतात.
३. हे लोक संकोची, लाजाळू आणि चाचरणारे असतात.
४. घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात हे लोक कार्य करतात.
५. आरोग्याच्या दृष्टीने फुफ्फुसांत शीत, पचनसंस्था आणि अताद्यांशी संबंधित आजार या लोकांमध्ये आढळतात. पोटाच्या विकाराने यांना सतत त्रास होतो. पायाच्या रोगांपासून सुद्धा सावध राहावे लागते.
६. बालपण आणि तारुण्य यांच्या तुलनेत यांची वृद्धावस्था अधिक सुखी आणि स्थिर असते.
७. या राशीच्या पुरुषांचे शरीर देखील स्त्रीयान्सारखे नाजूक असते. हे लोक नाजूक आणि ललित कलांवर प्रेम करणारे असतात.
८. आपल्या योग्यतेच्या बळावरच उच्च पदावर पोचतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे हे डगमगत नाहीत आणि आपले प्रसंगावधान, धैर्य आणि चातुर्य यामुळे हे लोक आयुष्यात पुढे जातात.
९. बुधाचा प्रभाव यांच्या जीवनात स्पष्ट दिसून येतो. चांगले डून, विचारपूर्ण जीवन, बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये नक्की देसून येते.
१०. शिक्षण आणि जीवनात सफलता मिळाल्यामुळे लाजाळूपणा आणि संकोच कमी होतात, परंतु नम्रता या लोकांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे.
११. यांना विनाकारण राग येत नाही. पण जेव्हा राग येतो तेव्हा तो लवकर संपत नाही. ज्याच्यामुळे राग आला, त्याच्या प्रती घृणेची भावना यांच्या मनात घर करून राहते.
१२. भाषण आणि बोलण्याची कला यांना चांगली अवगत असते. आप्तांकडून यांना विशेष लाभ होत नाही, यांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी नसते. हे आवश्यक नाही की यांचा कोण दुसऱ्याशी संबंध असल्यामुळेच असे होत असेल.
१३. यांचे प्रेम संबंध बहुतेक करून सफल होत नाहीत. म्हणूनच जवळच्या लोकांशी यांचे कायम खटके उडत असतात.
१४. या व्यक्ती धार्मिक विचारांमध्ये आस्था ठेवतात, परंतु कोणत्याही ठाम मतांचे नसतात. यांना प्रवाश फार करावा लागतो तसेच विदेश गमनाची सुद्धा शक्यता असते. ज्या कामाला हात घालतात ते मनापासून पूर्ण करूनच सोडतात.
१५. हे लोक अपरिचित लोकांमध्ये अधिक लोकप्रिय असतात, म्हणूनच त्यांनी आपला संपर्क विदेशामध्ये वाढवला पाहिजे. तसे पाहिले तर या कोणत्याही प्रकारच्या लोकांशी या लोकांची मैत्री होऊ शकते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.