चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
राशी स्वरूप: मेंढा, राशी स्वामी- मंगळ.
१. राशीचक्रातील सर्वात प्रथम रास मेष आहे. मेषेचा स्वामी मंगल आहे. धातू संज्ञक ही रास चर (चलित) स्वभावाची असते. राशीचा प्रतिक मेंढा संघर्षाचा परीचायक आहे.
२. मेष राशीवले लोक आकर्षक असतात. त्यांचा स्वभाव थोडा रुक्ष असतो. दिसायला हे लोक सुंदर असतात. या लोकांना कोणाच्याही हाताखाली किंवा दबावाखाली काम करायला आवडत नाही. यांचे चरित्र स्वच्छ आणि आदर्शवादी असते.
३. बहुमुखी प्रतिभेचे स्वामी असतात. समाजात यांचे वर्चस्व असते आणि यांना मान सन्मानाची प्राप्ती होते.
४. निर्णय घेण्यात घाई करतात आणि जे कार्य हाती घेतले असेल ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत.
५. यांचा स्वभाव कधी कधी विरक्तीचा देख्हील राहतो. लालसा, हाव करणे या राशीच्या लोकांच्या स्वभावात नसते. दुसऱ्यांची मदत करणे यांना आवडते.
६. कल्पनाशक्तीचे प्राबल्य राहते. खूप जास्त विचार करतात.
७. जसा आपला स्वभाव आहे, तशीच अपेक्षा दुसऱ्यांकडून करतात. या गोष्टीमुळे अनेकदा धोका सुद्धा खातात.
८. अग्नीतत्व असल्यामुळे राग फार लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती असते.
९. अपमान लवकर विसरत नाहीत, मनात धरून राहतात. संधी मिळताच बदला घेण्यास चुकत नाहीत.
१०. आपल्या जिद्दीवर किंवा हट्टावर अडून राहणे हे देखील मेष राशीच्या स्वभावात पाहायला मिळते. यांच्या आत एक कलाकार लपलेला असतो.
११. स्वतः प्रत्येक कार्य करण्यामध्ये सक्षम असू शकतात. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात.
१२. आपल्या मर्जीप्रमाणे दुसऱ्यांना वागवायला पाहतात. त्यामुळे यांचे अनेक शत्रू निर्माण होतात.
१३. एकच काम पुन्हा पुन्हा करणे या राशीच्या लोकांना आवडत नाही.
१४. एकाच ठिकाणी जास्त दिवस राहणे देखील यांना पसंत नसते. नेतृत्व क्षमता अधिक असते.
१५. कमी बोलणे, हत्ती, स्वाभिमानी, रागीट, प्रेम संबंधांमुळे दुःखी, वाईट कर्मांपासून दूर राहणारे, नोकर आणि महिलांमुळे त्रस्त, कर्मठ, प्रतिभाशाली, यांत्रिक कार्यांमध्ये सफल होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.