कथाकार
मी रसिकांसाठी काही कथा संग्रहित करून सांगणार आहे. या कथा तुम्ही बालपणी वाचलेल्या असू शकतात. किंवा तुमच्या आज्जी आजोबांनी सांगितलेल्या. तुमचं बालपण जगायला लावणाऱ्या काही कथांचा संग्रह आपल्या वाचनासाठी आणि बालपणीचे जीवन पुनः नव्याने जगण्यांसाठी घेऊन आलो आहे...!!
कुरुक्षेत्र

या पुस्तकांच्या मालिके मध्ये आपल्याला महाभारतातील युद्धाचे ते दिवस अगदी तंतोतंत जगता येतील. या कथा वाचून तुम्हाला आपण स्वतः कुरुक्षेत्रात असल्याचे वाटेल. त्यावेळच्या मानसिक आणि भौतिक परिस्थितींची जाणीव होईल. चला जाणून घेऊया कुरुक्षेत्रावर प्रत्येकाच्या मनात काय युद्ध चालू होते.?? अर्जुनाकडे श्रीकृष्णासारखा सारथी होता. पण भीष्म द्रोणाचार्य आदींच्या मनातले स्वतःच्या कर्तव्या विरुद्ध चाललेले युद्ध जाणून घेऊया.

नांदा सौख्य भरे

नांदा सौख्य भरे

बायको अशी असावी

बायको अशी असावी

सरळपणा

चीनमधल्या चांग नावाची साध्या मुलाची हि गोष्ट आहे.

सोन्याचा हंडा

दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी आहे.

गर्विष्ठ राजकन्या
Featured

कलिंग देशाच्या राजाची मुलगी मैनावती फार सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा तिला फार गर्व होता. तिचे गर्वहरण कसे केले याची कथा आहे.

ए मधल्या..!
Featured

ह्या कथेत महाभारतातातील एक प्रसंग मोठ्या मजेदार पद्धतीने मांडला आहे.

काळा चोर

या कथेत एका सावत्र आईने आपल्या मुलांना मृत्युच्य दाढेत पाठवले. त्यातुन ती मुले सुटून कशी आली? व त्याच्या बरोबर तेथे काय घडले याचे मजेशीर वर्णन आहे.

कृतघ्न राजा
Featured

एकेकाळी रोम देशांत यूनान नावाचा एक राजा राज्य करीत असे. त्याच्या दरबारी पुष्कळ मांडलीक राजे होते. राजा म्हणजे त्याला काहीतरी एक चिंता असलीच पाहिजे. हा राजा सुद्धा त्याला अपवाद नव्हता. त्याला एक भयंकर असा त्वचा रोग झाला. मोठमोठ्या वैद्यांची औषधे झाली. या राजाच्या रोगावर कुणी बरे उपाय केला असेल??आणि त्या वैद्याचे पुढे काय झाले जाणून घ्या...!!

रघुचे नशीब
Featured

एका गांवांत एक शेतकरी राहात असे. त्याला रघू नावाचा एक मुलगा होता. बापाचे रघूवर मुळीच प्रेम नव्हते. म्हणून तो त्याच्याकडून खूप कामे करून घेई. वास्तविक पाहतां रघु फार चांगला मुलगा होता. राघूचे पुढे काय झाले?? त्याच्या आयुष्यात त्याला काही रहस्यमयी खजिना सापडला की काय?? हि कथा नक्की वाचा..!!

खुज्यांचा देश
Featured

आल्पस् पर्वतावर राहाणाऱ्या खुजांच्या विषयीं आज सुद्धा कित्येक गोष्टी सांगितल्या जातात. असे म्हणतात की हे खुजे पर्वताच्या जंगलांत गुफेमध्य राहात असत. परंतु ती जागा सोडून ते दुसरीकडे कोठे तरी निघून गेले. या खुजांची उंची दोन फूट होती. फार दयाळू होते. जर कधी कोणी यांची मदत केली तर ते कधी हि विसरत नसत. या खुजांच्या जादुई दुनियेत सफर करवणारी हि कथा आहे.

जमिनीवर चालणारी नाव

फार फार पूर्वी एका देशांत एक राजा राज्य करीत होता. त्याला एक फार सुरेख मुलगी होती. ती फार लाडकी होती त्याची. तिच्यासाठी त्यानें तऱ्हेत-हेच्या वस्तू जमविल्या होत्या. तसल्या गोष्टींची त्याला फार आवड होती. सर्व तऱ्हेनें सुखी होता तो राजा. पण राजा म्हटला की त्याला काही तरी चिंता असावीच लागते. ह्या राजाला काही नाही तर जमिनीवर चालणाऱ्या एका विचित्र नावेचीच चिंता होती. त्या साठी त्याने काय काय केले... हे या कथेत रंजकपणे मांडले आहे..

भल्यासाठी सगळे

हि एक चायनीज दंतकथा आहे. या कथेत आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना सरतेशेवटी आपल्यालाच कश्या उपयोगी ठरतात ते सांगितले आहे.

डोळ्यात अंजन
Featured

हि एक रंजक चायनीज दंतकथा आहे.

पंचकल्याणी
Featured

पंचकल्याणीने कसे दोन प्रेमींना या समजाच्या बंधनातून मुक्त करवले याची सुंदर कहाणी यात दिली आहे. पंचकल्याणी नावाचा एक उमदा आणि आपल्या मालकाशी एकनिष्ठ असा घोडा आहे.

बाळकृष्ण

देवकीनें नीट गुंडाळून एका टोपलीत घालून एका दुपट्यांत त्याच्या स्वाधीन केलें. वासुदेव काही विचार न करता तडक निघाला आणि जस जसा तो जाऊं लागला तस तसे एकेक दरवाजे उघडत गेले. पाहारेकऱ्याना गाढ झोप लागलेली होती. तो मथुरा नगरीच्या बाहेर निसटून जाण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. पण अंधार म्हणजे मी म्हणत होता. वाटेचा अंदाज येत नव्हता. तरी तो मन घट्ट करून चालला होता. या सगळ्यात जन्माला आलेले ते मुल पुढे जाऊन सृष्टीचा पालनहार ठरेल.

चांगचे भाग्य
Featured

के फिन्ना गांवांत एक चांग नांवाचा व्यापारी राहात असे पैसे मिळविणे हा एकच त्याचा धंदा होता. पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने एक उपाय केला. चांदीची नाणी गाळून त्यांची चांदी पंधरा शेराची एक लड अशा लडी करून ठेवल्या.

भीमाचे तांडव

कुरुक्षेत्रावर पांचवा दिवस उजाडला. दोन्हीकडील सैन्ये सुसज्ज होऊन रणांगणावर पोहोचलीं, आज कौरव सैन्य मकरव्यूहांत सज्ज झाले व पांडव सैन्य श्वेनव्यूहांत उभे झाले. आघाडीला भीम उभा होता. भीष्माने जणूं पांडव सेनेचा नाश करण्याचा निर्धार केला होता. भीष्माचा उत्साह पाहून दुर्योधनाचा आनंद व उत्साह उफळू लागला.

मूर्ख जमीनदार

हि एक चायनीज दंतकथा आहे. अशी मजेदार आणि अर्थपूर्ण कथा वाचायला खूप मज्जा येते. हि कथा आपल्या अहं मुलांना वाचून दाखवा यात चांगला बोध असतो.

मृत्युपत्र

सुमारे पांच ते सहाशे वर्षांपूर्वी चीनच्या एका प्रांतांत राजाचा एक प्रतिनिधि राहात असे. त्याचे नांव होतें 'निशा चिचेन.' त्याने धरें, शेते, रोकड पैसे मिळून खूपशी संपत्ति जमवून ठेविली होती. त्याला एका मुलाशिवाय कोणी नव्हते. त्याची बायको मुलगा लहान असतांनाच मरून गेली होती. काही दिवसांनी त्याने नोकरी सोडून दिली आणि शेतीवाडी पाहूं लागला. त्याच्या आयुष्यातील ह प्रसंग आपल्याला एक बोध देऊन जातो.

राजा आणि चोर

पाटलीपुत्र राज्यातील राजाच्या पराक्रमी वृत्तीचे आणि प्रजेला समजून घेन्यासाठ त्याने काय काय केले याचे तंतोतंत वर्णन या कथेत केले आहे.

निरक्षर हव्यासी
Featured

भोज राजाच्या वेळी कधी कधी काही अक्षरशून्य ब्राह्मण कालिदासाकडे येत. त्याच्या हाता पायां पडत आणि राजाकडून आम्हाला काही दक्षिणा मिळवून या म्हणून त्याच्या पाठीस लागत. एकदा केशव शर्मा नावाचा एक ब्राह्मण कालिदासाच्या पाठीस लागला. पुढे त्याने राजाला कसे फसवले याची गमतीदार कथा आहे.

वासवदत्ता

या कथेत वासवदत्ता आणि एका राजकुमाराची प्रेमकथा लिहिलेली आहे.

सूड

वज्रगिरीचा राजा विक्रम सिंह ह्याला पद्ममुखी नांवाची एक मुलगी होती. ती फार सुंदर होती. म्हणून तिच्याशी लग्न करण्यासाठी दूर दूर देशांच्या राजकुमारांनी प्रयत्न केला. त्यांत रत्नगिरीच्या इंद्रवर्माला विक्रमसिंहाने पसंत केले. पद्ममुखीला हि तोच राजकुमार आवडला. संगपुरचा राजा कालकेतु याच्या मनातून सुद्धा पद्ममुखीशी लग्न करावयाचें होते. त्याच्या आईने त्याला सुचविलें की तू विक्रमसिंहाला जाऊन भेट, बहुतेक तो तुझे म्हणणे कबूल करील. आईच्या म्हणण्याप्रमाणे कालकेतु विक्रमसिंहाला भेटला. आपली इच्छा व्यक्त केली. परंतु विक्रमसिंहाने त्याला होकार दिला नाही. बिचारा उलट्या पावली परतला. तो परतल्यावर विक्रमसिंहाने इंद्रवर्माला बोलावून त्याच्याशी पद्ममुखीचे लग्न ठरविले. पद्म् मुखी बरोबर घडलेले प्रसंग या कथेत दिले आहेत.

विचारी सेवक

एका राज्याच्या राजपुत्राला वाईट संगतीमुळे आपल्या राज्याची होत असलेली अधोगती कधी दिसलीच नाही... आणि अचानक असे काही गाडले की त्याला आयुष्यातला मोठा धडा मिळाला... त्यावर हि कथा आहे.

भूताची टेकडी

पश्चिम घाटांत पुष्कळ लहान लहान टेकडया आहेत. त्यांतील एका टेकडीचे नांव भुताची टेकडी असे पडले आहे. धनगर, गुराखी आपली जनावरें आजूबाजूच्या टेकड्यांवर नेत असत. परंतु या टेकडीवर कोणास हि जाऊन देत नसत. कारण जो कोणी त्यावर जात असे तो कधी परतून येत नसे. त्या भुताटकीच्या टेकडीवर एक मोठा गाईचा कळप राहात असे. सकाळी सूर्योदय होतांच त्या गाई गोठ्यांतून बाहेर येऊन चरत असत व संध्याकाळ होतांच गुराख्याने वळवल्याप्रमाणे घराकडे परतत असत. या टेकडीची हि कथा आहे.

विष्णूसेन
Featured

कुंतीभोज वैरंत्य नगराचा राजा होता. त्याला दोन बहिणी होत्या. एकीचे नांव सुदर्शना होते. ती काशी राजाची राणी होती. दुसरी सुचेतना. तिला सौवीर राजाला दिले होते. सुदर्शनाला वाटले की आपल्याला एक फार तेजस्वी पुत्र व्हावा. म्हणून तिनें कुन्ती प्रमाणेच मंत्रोच्चाराने अग्नीदेवाचा साक्षात्कार करून घेतला. त्याच्या कृपेने तिला पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचे आयुष्य आणि त्याची जडणघडण यात दिली आहे.

प्रतिमा
Featured

महाराज दशरथानें श्री रामचंद्राच्या राज्याभिषेकाचा दिवस निश्चित ठरविला. अयोध्या नगरी आनंद सागरांत बुडून गेली. अयोध्यावासी उत्साहाने राज्याभिषेकाच्या तयारीला लागले. सिंहासन तयार झाले. छत्र चामर तयार झाले. सुवर्ण कलश तयार झाले. अशा या मंगल प्रसंगी लोकरंजनार्थ अभिनय कलावंतांना नाट्य प्रयोग करण्याची आज्ञा दिली होती. अवदातिका नांवाच्या सीतेच्या एका दासीन रेवा देवीजवळ अशोक वृक्षाची एक शाखा मागितली. आणि पुढे काय घडले सीतेच्या आणि रामाच्या आयुष्यात याची हि कथा आहे..!!

टिल्लू
Featured

एके काळी जर्मनीमध्ये टिल्लू नांवाचा एक मुलगा होता. लहानपणापासूनच तो फार वात्रट होता. खोटे बोलणे, लोकांना त्रास देणे याचे जणुं बाळकडूच त्याला मिळाले होते. त्याने काही कामधंदा शिकावा, शेतीवाडी करावी म्हणून बापाने पुष्कळ प्रयत्न केला. कमीत कमी त्याने घरांतील काम थोडे फार करावे म्हणून आईनें पण भरपूर प्रयत्न केले, पण सर्व व्यर्थ, त्याचा उनाडपणा कांही गेला नाही. हि गोष्ट त्याच्या उनाडपणाची आहे...!

राज्याभिषेक
Featured

वालीने सुग्रीवाचे राज्य घेतले आणि त्याची बायको हि पळवून नेली. त्यामुळे सुग्रीव चिंतीत झाला. तो मारुतीला बरोबर घेऊन राम लक्ष्मण मदत करतील का म्हणून विचारण्यास त्यांच्याकडे गेला. किम्किया पर्वतावरच त्यांची भेट झाली. रामायणातील एक कथा येथे सांगितली आहे.