उठीं उठी श्रीदत्तात्रेया । श्रीपादश्रीवल्लभा सदया ।

श्रीनृसिंहसरस्वती गुरुवर्या । दर्शन देई भक्‍तांसी ॥ध्रु०॥

पंच पंच उषःकाल जाहला । अरुणोदय सप्तपंच धाटिला ।

अष्टपंच प्रातःकाला । उदया पावे रवि पूर्ण ॥१॥

आले अमरेंद्रादि अमर । संत साधु मुनिवर ।

समग्र आले नारीनर । कांकड आरती पहावया ॥२॥

नमितां पूर्ण मनोरथ होती । त्रिविध ताप समूळ हरती ।

पूर्वज समस्त उद्धरती । कांकड आरती देखिलिया ॥३॥

वेगें उठती सद्‌गुरुमूर्ती । सकळिक पदांबुज वंदिती ।

स्तवनीं ध्यानी ओवाळिती । विश्वव्यापक परमात्मा ॥४॥

गुरुत्रैमूर्ति आश्रम घेऊन । तरुवरीं ब्रीदरक्षणार्थ राहुन ।

स्मरतां तारिसी जन संपूर्ण । रक्षिसी गुरुभक्त सर्वदा ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel