गुलाबी शहर (Pink City) जयपूर येथील अलिशान इमारत "हवामहल" राजस्थानचे प्रतीक या रूपाने जगभरात प्रसिद्ध आहे. या इमारतीत तब्बल ३६५ खिडक्या आणि झरोके आहेत. याची निर्मिती १७९९ मध्ये जयपूरचे महाराज सवाई प्रताप सिंह यांनी केली होती. राजस्थानी आणि फारसी स्थापत्यकलेचे संमिश्र रूप असलेली ही इमारत जयपूरच्या "बडी चौपड" चौकापासून "चांदी की टकसाल" कडे जाणाऱ्या मार्गावर स्थित आहे. हवामहलचे आनंदपोल आणि चांदपोल नावाचे दोन दरवाजे आहेत. आनंदपोलवर असलेल्या गणपतीच्या प्रतिमेमुळे याला गणेश पोल देखील म्हणतात. गुलाबी शहराचा हा गुलाबी गौरव आपल्या अद्भुत बनावटीमुळे आजही विश्वविख्यात आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.