इंग्रजांनी व्यवस्थित रणनीती ठरवली आणि आधी ते व्यापार करण्याच्या निमित्ताने भारतात आले. १६१८ मध्ये जहांगीर याने इंग्रजांना भारतात व्यापार करण्याचा अधिकार दिला होता. त्यामागे जहांगिराची देखील रणनीती होती. जहांगीर आणि इंग्रजांनी मिळून १६१८ ते १७५० पर्यंत भारतातील बहुतांश राजवाडे फसवाफसवी आणि कपट करून आपल्या ताब्यात घेतले होते. बंगाल अजून त्यांच्या हातात सापडले नव्हते आणि त्या वेळी बंगाल चा नवाब होता सिराजुद्दौला. इंग्रजांनी राजपूत, शीख इत्यादींकडून सत्ता हिसकावून घेतली होती, परंतु प्लासीच्या युद्धाचीच जास्त चर्चा होते. हे एक अर्ध सत्य आहे.
२३ जून १७५७ ला मुर्शिदाबाद च्या दक्षिणेला २२ मैल अंतरावर नदिया जिल्ह्यात गंगा नदीच्या किनारी प्लासी नावाच्या स्थानावर हे प्लासीचे युद्ध झाले होते. या युद्धात एका बाजूला ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची सेना होती तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या नवाबाची सेना. कंपनीच्या सेनेने रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्वाखाली नवाब सिराजुद्दौला याला पराभूत केले होते. या युद्धाला भारतासाठी अत्यंत दुर्भाग्यजनक मानले जाते. या युद्धापासूनच भारताची गुलामीची कहाणी सुरु होते.
यानंतर कंपनीने ब्रिटीश सैन्याच्या मदतीने हळू हळू आपले पाय रोवायला सुरुवात केली आणि जवळ जवळ संपूर्ण भारतावर कंपनीचा ध्वज फडकवला. उत्तर आणि दक्षिण भारतातील सर्व मुस्लीम शासकांसह शीख, मराठा, राजपूत आणि अन्य शासकांच्या शासनाचा अंत झाला.