अशोक वाटिका लंकेत आहे, जिथे रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला बंदी बनवून ठेवले होते. असे मानले जाते की एलिया पर्वतीय क्षेत्रातील एका गुहेत सीता मातेला ठेवण्यात आले होते, जिला 'सीता एलिया' नावाने ओळखण्यात येते. इथे सीता मातेचे एक मंदिर देखील आहे.
इथेच अंजनीपुत्र हनुमानाने खुणेच्या रुपात रामाची अंगठी सीतेला सुपूर्द केली होती. अशी मान्यता आहे की अशोक वाटिकेत नावाप्रमाणेच अशोकाचे वृक्ष मुबलक प्रमाणात होते. रामाच्या विरहाने व्याकूळ झालेली सीता आपली इहलोकाची यात्रा समाप्त करण्याच्या मनस्थितीत होती. तिची इच्छा होती की जर अग्नी मिळाला तर स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करावे. एवढेच नव्हे तर तिने नवीन कळ्यांनी युक्त असलेल्या अशोकाच्या वृक्षांकडून देखील अग्नीची मागणी केली होती. तुळशिदासांनी लिहिले आहे - ‘नूतन किसलय अनल समाना, देही अगिनि जन करही निदाना’ म्हणजेच तुझी नवीन पालवी अग्नीच्या समान आहे. तेव्हा मला अग्नी प्रदान कर आणि माझ्या दुःखाचे शमन कर.