मोरारजी देसाई भारताचे स्वाधीनता सेनानी आणि सहावे पंतप्रधान (१९७७ - ७९) होते. हे पहिले पंतप्रधान होते जे कॉंग्रेस पक्ष सोडून इतर पक्षाचे होते. ते एकमात्र व्यक्ती आहेत ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान निशान-ए-पाकिस्तान ने सन्मानित करण्यात आले आहे.
ते वयाच्या ८१ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. त्यापूर्वी देखील त्यांनी अनेक वेळा पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश आले नव्हते. पण याचा अर्थ असा नव्हे की ते पंतप्रधान व्हायला लायक नव्हते. प्रत्यक्षात हे त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की एक वरिष्ठ नेता असून देखील नेहरू आणि शास्त्रींच्या निधनानंतर त्यांना पंतप्रधान बनवले गेले नाही. मोरारजी देसाई मार्च १९७७ मध्ये भारताचे पंतप्रधान झाले परंतु त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नाही. चौधरी चरण सिंग यांच्याशी मतभेदामुळे त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले.