https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/0f/df/61/0fdf6173d173f3a1f9f6a80713b22818.jpg

दशरथाच्या ३ पत्नी होत्या -  कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी. रामाला ३ भाऊ होते - लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम हा कौसल्येचा पुत्र होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे दोघे सुमित्रेचे पुत्र होते. कैकयी च्या पुत्राचे नाव भरत. लक्ष्मणाच्या पत्नीचे नाव उर्मिला, शत्रुघ्नच्या पत्नीचे नाव श्रुतकीर्ति आणि भरतच्या पत्नीचे नाव मांडवी होते. सीता आणि उर्मिला राजा जनकाच्या कन्या होत्या तर मांडवी आणि श्रुतकीर्ती कुशध्वज राजाच्या कन्या होत्या. लक्ष्मणाला अंगद आणि चंद्रकेतू नावाचे दोन पुत्र होते, तर रामाला लव आणि कुश नावाचे दोन पुत्र होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel