श्री ओंकारेश्वर महादेव

प्राचीन काळी शंकराने एक दिव्य पुरुष प्रकट केला. पुरुषाने शंकराला विचारले की मी काय कार्य करू तेव्हा शंकराने त्याला सांगितले की तू आपल्या आत्म्याचे विभाजन कर. शंकराचे बोलणे न समजल्यामुळे तो पुरुष सचिंत झाला, तेव्हा त्याच्या शरीरातून एक आणखी पुरुष उत्पन्न झाला. शंकराने त्याचे नाव ॐकार ठेवले. शंकराच्या आज्ञेने ॐकार ने वेद, देवता, सृष्टि, मनुष्य, ऋषि उत्पन्न केले आणि शंकराच्या समोर येऊन उभा राहिला.
शंकराने प्रसन्न होऊन ॐकार ला सांगितले की तू महाकाल वनात जा आणि तिथे शूलेश्वर महादेवाच्या पूर्वेला असलेल्या शिवलिंगाचे दर्शन पूजन कर. ॐकार तिथे गेला आणि शिवलिंगाचे पूजन करून त्याच्यात विलीन होऊन गेला. ॐकार शिवलिंगात विलीन झाल्यामुळे हे शिवलिंग ओंकारेश्वर किंवा ॐकारेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करतो त्याला सर्व तीर्थ यात्रा केल्याचे पुण्य प्राप्त होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel